IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी

धावांचा पाठलाग करताना गिल, साईसह बटलरचं अर्धशतक ठरलं व्यर्थ

By सुशांत जाधव | Updated: May 17, 2026 00:06 IST2026-05-16T23:53:34+5:302026-05-17T00:06:41+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Sunil Narine Shine After Finn Allen Angkrish Raghuvanshi And Cameron Green Firey Inning Shubman Gill's 85 In Vain As KKR Beat GT Throw Playoff Race Wide Open | IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी

IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी

IPL 2026, KKR vs GT : फिन ॲलन, अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीनच्या वादळी खेळीनंतर सुनील नरेनच्या फिरकीतील जादुच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने 'करो वा मरो'ची लढाई जिंकली. २४८ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलरनं तगडी फाईट दिली. पण मोक्याच्या क्षण सुनील नरेन याने कर्णधार गिलची विकेट घेतली आणि सामना कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूनं फिरवला. GT चा विजय रथ रोखत २९ धावांनी सामना जिंकत KKR नं प्लेऑफ्सची आस कायम ठेवली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!


अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो

नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणेनं फिन ॲलनच्या साथीनं कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाची सुरुवात केली. पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धावफलकावर ४४ धावा असताना अजिंक्य रहाणेनं चुकीचा फटका खेळत मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली. तो १४ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. 

षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज

फिन ॲलन, रघुवंशीसह कॅमरून ग्रीनचा धमाका

कोलकाताच्या संघाला पहिला धक्का बसल्यावर फिन ॲलन आणि अंगकृष रघुवंशी जोडी जमली. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४१ चेंडूत ९५ धावांची भागीदारी रचली. फिन ॲलन ३५ चेंडूत ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ९३ धावांची खेळी करून बाद झाला. साई किशोरच्या गोलंदाजीवर राशिद खानने झेल घेत केकेआरच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन जोडीनं तुफान फटकेबाजी कायम ठेवत संघाच्या धावफलकावर २ बाद २४७ धावा लावत गुजरात टायटन्सच्या संघासमोर २४८ धावांचे तगडे आव्हान सेट केले. अंगकृष रघुवंशीनं ४४ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा केल्या . दुसऱ्या बाजूला कॅमरून ग्रीन याने २८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५२ धावांची नाबाद खेळी साकारली.  

धावांचा पाठलाग करताना गिल, साईसह बटलरचं अर्धशतक ठरलं व्यर्थ

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने दिलेल्या तगड्या धावसंख्येचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि साई सुदर्शन जोडीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. दुखापतीमुळे साई सुदर्शन रिटायर्ड हर्ट झाल्यावर मैदानात उतरलेला निशांत सिंधु अवघ्या एका धावेची भर घालून माघारी फिरला. शुभमन गिल आणि जोस बटलर या जोडीनं फलंदाजीतील धमक दाखवून देत धावांचा यशस्वी पाठलाग करण्याच्या दिशेनं संघाचा प्रवास सुरु ठेवला. अजिंक्य रहाणेनं १७ व्या षटकात सुनील नरेनच्या हाती चेंडू सोपवला. त्याने या षटकात शुभमन गिलच्या खेळीला ब्रेक लावला. त्याने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली. याशिवाय जोस बटलरने ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची बहुमूल्य खेळी केली. अखेरच्या षटकात पुन्हा मैदानात उतरत साई सुदर्शन याने २८ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Web Title : गिल का विकेट लेकर नरेन ने पलटा मैच; केकेआर ने जीटी को हराया।

Web Summary : केकेआर ने जीटी को 29 रनों से हराया, प्लेऑफ की उम्मीदें बरकरार रखीं। एलन, रघुवंशी और ग्रीन की विस्फोटक बल्लेबाजी और नरेन के गिल के महत्वपूर्ण विकेट ने जीटी के गिल और बटलर के मजबूत संघर्ष के बावजूद जीत सुनिश्चित की।

Web Title : Narine's wicket of Gill turns match; KKR defeats GT.

Web Summary : KKR defeated GT by 29 runs in a high-scoring match, keeping playoff hopes alive. Allen, Raguvanshi, and Green's explosive batting, followed by Narine's crucial wicket of Gill, sealed the victory despite strong fight from GT's Gill and Buttler.