Next

मुख्यमंत्र्यांच्या कन्येविरुद्ध एक हजार शेतकरी लढवणार निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 03:25 PM2019-03-24T15:25:57+5:302019-03-24T15:28:38+5:30

लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणाऱ्या सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ...

लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणाऱ्या सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या कविता या निजामाबाद मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघात हळदी आणि ज्वारीच्या किमान आधारभूत किमतीसाठी एक हजार शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गावातून पाच शेतकऱ्यांनी अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे.