Next

पंकजा मुंडेंनी बसने प्रवास का केला? Why did Pankaja Munde travel by bus at Nashik?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 02:49 PM2021-11-04T14:49:01+5:302021-11-04T14:49:27+5:30

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हा नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शहरातील सिटीबसमधून प्रवास करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. विशेष म्हणजे त्यांनी हा प्रवास तिकीट काढून केला. मी आमदार नाही त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणार असं त्यांनी आधीच म्हटलं होतं.. कार्यक्रम संपल्यानंतर त्या रस्त्यावर उभ्या असलेल्या सिटी बसमध्ये बसल्या, त्यामुळे कार्यकर्ते व प्रवासी आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासमवेत आमदार जयकुमार रावल, आमदार सीमा हिरे, महापौर सतीश कुलकर्णी होते. बसमधील वाहकांकडून तिकिट काढून त्यांनी सावरकर नगर ते अशोकनगर असा प्रवास केला. नाशिकमधील बससेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजा मुंडे यांनी महापौरांचे विशेष कौतुक केले. मात्र तिकीट काढून केलेल्या प्रवासामुळे नाशिकात पंकजाच्या या प्रवासाची चांगलीच चर्चा रंगली.