Next

BJP Masterstroke...तर उत्पल भाजपत परतणार, काय सेटींग झाली ? Utpal Parrikar in BJP if wins from Panji

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 11:22 PM2022-02-13T23:22:19+5:302022-02-13T23:22:39+5:30

धक्कातंत्र अर्थात मास्टरस्ट्रोक्सच्या बाबतीत भाजपचा हात कुणीच पकडू शकत नाही. आता आणखी एक धक्का द्यायच्या तयारीत भाजप आहे. गोवा निवडणूक उत्पल पर्रिकरांच्या बंडामुळे चर्चेत आली. दिवंगत मनोहर पर्रिकरांची पुण्याई, सहानुभूतीचा लाट, भाजपकडून आयात काँग्रेस उमेदवाराला संधी आणि स्वच्छ प्रतिमा या जोरावर पणजीतून उत्पल निवडून जातील अशी हवा झालीय. मग आता यात भाजपचा मास्टरस्ट्रोक कोणता, तर उत्पल जर पणजीतून जिंकले तर त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले असतील, उत्पल पणजीतून जिंकतील आणि भाजपत जातील किंवा भाजपत मानानं जाण्यासाठीच उत्पल पणजीतून जिंकून दाखवतील, अशी चर्चा जोरानं सुरु झालीय. आता गंमत बघा गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही उत्पल यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले असतील का यावर थेट पण सूचक भाष्य केलंय. उत्पल भाजपत परतणार...