बारामती तालुक्यातील मुढाळे गावात भोरड्या पक्ष्यांचे नृत्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हर्रर्र हुश हरर्र भोरडी ...अशी हाक देउन भोरड्यांचे नृत्य पाहुन हरखुन गेलेले पर्यटक त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणूनच पुढे येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.आगरझरी येथे उभारण्यात आलेल्या बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्डच्या लोकार्पणाप्रसंगी शनिवारी ते बोलत ...
निसर्ग पर्यटन विकास मंडळातर्फे येत्या दोन वर्षात राज्यातील ३२० पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ६७ प्रकल्पांकरिता ५७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून चालू आर्थिक वर्षात या कामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सिंधुकन्या या हाऊसबोटीला काही दिवसांपूर्वी भलेमोठे छिद्र पडले. याकडे एमटीडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने आजही ही पर्यटकांच्या सेवेतील हाऊसबोट तारकर्ली खाडीपात्रात शेवटच ...
जुन्नरजवळील तुळजा लेणीसमूहात लेण्यांच्या अभ्यासासाठी आलेल्या दक्षिण कोरियातील पर्यटकांवर येथील लेण्यांमध्ये असणा-या मधमाशांनी हल्ला चढविला. त्यांच्यावर जुन्नरमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...
डिसेंबर महिन्याच्या शेवटी लागलेल्या आगीत कास पठारावरील बराच भाग भस्मसात झाल्यानंतर वन विभागाने सतर्क होत कास पठाराच्या सुरक्षेत वाढ करत संयुक्त वन समितीच्या माध्यमातून त्याच परिसरातील खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास पहारा देणार आहेत. तसेच पर्यटक ...