निवडणुकांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची माहिती आघाडीच्या प्रसारमाध्यमांत जाहिराती देऊन जनतेला न सांगितल्याने न्यायालयाचा अवमान झाला असून त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व निवडणूक आयोगाला नोटिसा बजावल्या आहेत. ...
विधानसभेच्या काटोल मतदार संघातील पोटनिवडणुकीवरील अंतरिम स्थगितीला भारतीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आयोगाने यासंदर्भात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर १ एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...
प. बंगालमधून आलेल्या नॅशनल इन्श्युरन्स कंपनी वि. मौशुमी भट्टाचार्य या अपिलात उपस्थित झालेला एक रोचक मुद्दा न्या.डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल देऊन निकाली काढला. ...
ज्या व्यक्तीशी पटत नाही, जिचा सहवासही नकोसा वाटतो अशा वैवाहिक भागीदारासोबतच राहण्याची सक्ती करणारा कायदा राज्यघटनेच्या निकषांवर वैध ठरतो का, असा महत्त्वपूर्ण विषय आता सर्वोच्च न्यायालयापुढे आला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई व ख्यातनाम विधिज्ज्ञ मुकुल रोहटगी यांचा समावेश असलेल्या निवड समितीने लोकपालांच्या अध्यक्षपदासाठी न्या. घोष यांचे नाव निश्चित केले. ...