Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 

महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 

Amul milk price hike 2026 : महासंघाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ताज्या दुधाच्या पाऊचमधील प्रमुख प्रकारांच्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सरासरी २.५ ते ३.५ टक्के एवढी आहे. जी सध्याच्या अन्न महागाई दराच्या तुलनेत कमी असल्याचेही महासंघाने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 19:57 IST2026-05-13T19:56:54+5:302026-05-13T19:57:15+5:30

Amul milk price hike 2026 : महासंघाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ताज्या दुधाच्या पाऊचमधील प्रमुख प्रकारांच्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सरासरी २.५ ते ३.५ टक्के एवढी आहे. जी सध्याच्या अन्न महागाई दराच्या तुलनेत कमी असल्याचेही महासंघाने म्हटले आहे.

Inflation shock, Amul increases milk prices know about When will the new prices be implemented | महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 

महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 

देशातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'अमूल'ने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. गुजरात सहकारी दुग्ध विपणन महासंघ (GCMMF) ने दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ १४ मे २०२६ पासून संपूर्ण देशभरात लागू होईल.

महासंघाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ताज्या दुधाच्या पाऊचमधील प्रमुख प्रकारांच्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सरासरी २.५ ते ३.५ टक्के एवढी आहे. जी सध्याच्या अन्न महागाई दराच्या तुलनेत कमी असल्याचेही महासंघाने म्हटले आहे.

काय आहे दरवाढीचं कारण? -
दूध उत्पादन आणि संचालनाच्या खर्चात झालेली मोठी वाढ, हे या दरवाढीचे मुख्य कारण आहे. पशुखाद्य, दुधाच्या पॅकेजिंग फिल्म्स आणि इंधनाच्या दरात लक्षणीय वाढ, आदी गोष्टींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे महासंघाने म्हटले आहे. याच वेळी, या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांनाही मिळेल, असेही महासंघाने म्हटले आहे. जीसीएमएमएफच्या सदस्य संघांनी दूध खरेदी दरात ३० रुपये प्रति किलो फॅटची वाढ केली आहे. ती मे २०२५ च्या तुलनेत ३.७ टक्क्यांनी अधिक आहे.

यापूर्वीही करण्यात आली होती दर वाढ -
यापूर्वी १ मे २०२५ रोजी दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. अमूल हा देशातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक सहकारी संघ असल्याने या निर्णयाचा परिणाम देशभरातील कोट्यवधी ग्राहकांवर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, दुधाच्या किमती वाढल्यामुळे केवळ घरगुती बजेटच कोलमडणार नाही, तर दुधावर आधारित इतर पदार्थ जसे की चहा, कॉफी, मिठाई आणि विविध डेअरी उत्पादनांच्या किमतीही येत्या काळात वाढू शकतात. 

 

Web Title : अमूल ने दूध की कीमतें बढ़ाईं: उपभोक्ताओं पर प्रभाव

Web Summary : अमूल ने 14 मई, 2026 से पूरे देश में दूध की कीमतों में ₹2 प्रति लीटर की वृद्धि की है। पशु आहार और पैकेजिंग में बढ़ती उत्पादन और परिचालन लागत को कारण बताया गया है। किसानों को खरीद मूल्य में वृद्धि से भी लाभ होगा। यह 1 मई, 2025 को पहले की मूल्य वृद्धि के बाद है, जो घरेलू बजट और डेयरी उत्पाद की लागत को प्रभावित करती है।

Web Title : Amul Hikes Milk Prices: Impact on Consumers Explained

Web Summary : Amul has increased milk prices by ₹2 per liter nationwide from May 14, 2026. Rising production and operational costs, especially in animal feed and packaging, are cited as reasons. Farmers will also benefit from increased procurement prices. This follows a prior price hike on May 1, 2025, affecting household budgets and dairy product costs.