Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी

अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी

महत्वाचे म्हणजे, १३ मे च्या रात्रीपासून होणारा पुरवठा आणि १४ मे च्या सकाळपासून बाजारपेठेत मिळणाऱ्या दुधावर हे नवे दर लागू राहतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 21:31 IST2026-05-13T21:29:15+5:302026-05-13T21:31:02+5:30

महत्वाचे म्हणजे, १३ मे च्या रात्रीपासून होणारा पुरवठा आणि १४ मे च्या सकाळपासून बाजारपेठेत मिळणाऱ्या दुधावर हे नवे दर लागू राहतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

After Amul, now Mother Dairy is also in trouble! Milk has become expensive, new prices announced from buffalo milk to full cream; See the complete list | अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी

अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी

अमूलनंतर आता 'मदर डेअरी'नेही (Mother Dairy) ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या विविध प्रकारच्या लिक्विड दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही नवी दरवाढ उद्यापासून अर्थात १४ मे २०२६ पासून देशभरात लागू होईल.

असे असतील नवे दर -
मदर डेअरीने दरवाढीसंदर्भात बुधवारी एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. यापूर्वी कंपनीने एप्रिल २०२५ च्या शेवटी दुधाच्या किमतीत बदल केला होता. आता नव्या दरांनुसार, "टोकन दुधाची किंमत आता ५६ रुपयांऐवजी ५८ रुपये प्रति लिटर असेल. फुल-क्रीम दुधाची किंमत ७० रुपयांवरून ७२ रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. टोन्ड दुधाची किंमत ५८ रुपयावरून ६० रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे.

या शिवाय, डबल-टोन्ड दुधाची किंमत ५२ रुपयांऐवजी ५४ रुपये प्रति लिटर असेल. गाईच्या दुधाची किंमत ६० रुपयांऐवजी ६२ रुपये प्रति लिटर असेल आणि प्रो-मिल्कची किंमत ७० रुपयांऐवजी ७२ रुपये प्रति लिटर असेल.

महत्वाचे म्हणजे, १३ मे च्या रात्रीपासून होणारा पुरवठा आणि १४ मे च्या सकाळपासून बाजारपेठेत मिळणाऱ्या दुधावर हे नवे दर लागू राहतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Web Title : अमूल के बाद मदर डेयरी ने भी बढ़ाए दूध के दाम

Web Summary : अमूल के बाद, मदर डेयरी ने भी दूध की कीमतों में ₹2 प्रति लीटर की वृद्धि की। नई दरें 14 मई 2026 से लागू। टोकन दूध अब ₹58, फुल-क्रीम ₹72, टोन्ड ₹60 का। डबल-टोन्ड ₹54, गाय का दूध ₹62 और प्रो-मिल्क ₹72 का मिलेगा।

Web Title : Mother Dairy Hikes Milk Prices; New Rates Announced Nationwide

Web Summary : Following Amul, Mother Dairy increased liquid milk prices by ₹2 per liter, effective May 14, 2026. Token milk now costs ₹58, full-cream ₹72, toned ₹60. Double-toned is ₹54, cow milk ₹62, and pro-milk ₹72. The new rates apply from the night of May 13th.