आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 21:09 IST2026-05-13T21:07:31+5:302026-05-13T21:09:36+5:30

एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये मोठी कपात...!

Crisis in the skies Many international flights of Air India break More than 6 thousand flights delayed worldwide | आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 

आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 

वाढती जागतिक आव्हाने आणि आर्थिक गणित, यांमुळे हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. एअर इंडियाने जून ते ऑगस्ट २०२६ दरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द अथवा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही क्षेत्रांमधील हवाई हद्दीवरील निर्बंध आणि जेट इंधनाच्या (Jet Fuel) वाढलेल्या किमतींमुळे हा कठीण निर्णय घ्यावा लागल्याचे एअरलाइनने स्पष्ट केले आहे. तसेच, प्रवाशांची सुरक्षितता आणि परिचालन कार्यक्षमता यांचा समतोल साधण्यासाठी निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सेवांची पुनर्रचना करण्यात आल्याचेही एअर इंडियाने म्हटले आहे.

सर्वाधिक परिणाम अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या दिशेने होणाऱ्या उड्डाणांवर -
या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या दिशेने होणाऱ्या उड्डाणांवर होणार आहे. दिल्ली-शिकागो सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को उड्डाणे साप्ताहिक १० वरून ७ करण्यात आली आहेत. दिल्ली-टोरंटो सेवा जुलैपर्यंत निम्मी करण्यात आली आहे. याउलट, मुंबई-नेवार्क उड्डाणांमध्ये वाढ करण्यात आली असली तरी दिल्ली-नेवार्क आणि मुंबई-न्यूयॉर्क सेवा तात्पुरत्या निलंबित राहतील. युरोपमधील दिल्ली ते पॅरिस, कोपेनहेगन, व्हिएन्ना आणि रोम यांसारख्या शहरांच्या उड्डाण संख्येतही कपात करण्यात आली आहे.

केवळ अमेरिका अथवा युरोपच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया आणि आशियाई मार्गांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. दिल्ली ते मेलबर्न, सिडनी आणि सिंगापूरला जाणाऱ्या उड्डाणांची संख्याही कमी करण्यात आली आहे. चेन्नई-सिंगापूर सेवा ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद असेल. 

जगभरात ६,३६३ उड्डाणांना विलंब -
दरम्यान, 'FlightAware.com' च्या आकडेवारीनुसार, आज जगभरात ६,३६३ उड्डाणांना विलंब झाला असून एकूण ३९१ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये अमेरिकेशी संबंधित उड्डाणांचा मोठा वाटा आहे. 

 

Web Title : खर्च बढ़ने से एयर इंडिया ने अंतरराष्ट्रीय उड़ानें घटाईं

Web Summary : जेट ईंधन की बढ़ती कीमतों और हवाई क्षेत्र प्रतिबंधों के कारण एयर इंडिया ने अगस्त 2026 तक अंतरराष्ट्रीय उड़ानें कम कर दी हैं। अमेरिका, कनाडा, यूरोप, ऑस्ट्रेलिया और एशिया के लिए उड़ानें प्रभावित हैं, कुछ मार्ग अस्थायी रूप से निलंबित या कम किए गए हैं। विश्व स्तर पर, हजारों उड़ानें देरी और रद्द होने का सामना कर रही हैं।

Web Title : Air India slashes international flights amid rising costs, disruptions.

Web Summary : Air India is reducing international flights until August 2026 due to high jet fuel costs and airspace restrictions. Flights to America, Canada, Europe, Australia, and Asia are affected, with some routes temporarily suspended or reduced. Globally, thousands of flights face delays and cancellations.