जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालकोट भागात अनेक दहशतवादी अड्डे उधवस्त केले. फोटो दाखवत एअर स्ट्राईकबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी संशय व्यक्त केला ...
पुलवामा हल्ल्याला जे लोक अपघात बोलतात, ते लोक दहशतवादी ओसामा बिन लादेनला शांतीदूत मानतात असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्यावर केला. ...
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा मुलगा हम्माद व भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ यांच्यासह बंदी घातलेल्या संघटनांच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानमधील तपास यंत्रणांनी मंगळवारी अटक केली आहे. ...
बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. ...