राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sharad Pawar Party Name: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव देण्यास सांगितले होते. ...
महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत नाही ही सामान्य लोकांची तक्रार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले. ...
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन जोरदार चर्चा सुरू होती. काल रात्री यावरुन निवडणूक आयोगाने निकाल दिला असून खासदार शरद पवारांना धक्का दिला आहे. ...