Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नियम, परंपरा, रूढी यांची चौकट आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावे याकरीता आहे, त्यात अडकून राहावे यासाठी नाही. हे लक्षात घेऊन आपण सण उत्सव साजरे केले पाहिजेत! ...
कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही, असे मानले जाते. म्हणून शाकंभरी नवरात्रीतही पौष शुक्ल नवमीला चंडिकेची आणि कुमारिकेची पूजा करतात. ...
सोमवारी अर्थात १० जानेवारी पासून शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे. ही नवरात्र चैत्र आणि शारदीय नवरात्री इतकीच महत्त्वाची आहे. त्यानिमित्त जाणून घ्या या व्रताबद्दल सविस्तर माहिती ...
कोजागरी पौर्णिमेनिमित्त अनेक जण कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी शहरातील उद्यानांमध्ये जात असतात. मात्र, यावर्षीही शहरातील महापालिकेची सर्व उद्याने बंदच राहणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. ...
Sharad Purnima 2021 : चंद्राचा प्रकाश केवळ शांत व शीतल आहे एवढेच नाही, तर तो उपयोगी व उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. ...
Sharad Purnima 2021 : लक्ष्मी मातेचा वरदहस्त कायम राहून वैभवलक्ष्मी व गृहलक्ष्मी सदैव प्रसन्न राहावी असे वाटत असेल, तर सदैव जागृततेने प्रत्येक काम करा! ...
Bhondla 2021 : पाटावर हत्ती काढतात तसे काही ठिकाणी हदग्याच्या झाडाची फांदी उभी करून त्याभोवती फेर धरण्याची प्रथा आहे. हदगा हा एक पावसाचा उत्सव आहे. ...
Kojagiri Purnima 2021 : जागरण तर आपण रोजच करतो. परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे. अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. ...