बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात अटकेत असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तचर रजनी पंडित यांची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी अद्याप फरार आहेत. ...
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट आखण्याच्या तयारीत असलेला दहशतवादी अब्दुल कुरेशी उर्फ तौकीर याच्या अटकेनंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकही अलर्ट झाले आहे. खबरदारी म्हणून दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या मुंबईत प्रजासत्ताक दिनी सुरक्षेच्या दृष्टीने ...
एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार मालवणीत रविवारी घडला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या दखलपात्र गुन्ह्यात (एफआयआरमध्ये) अपहरणाचे कलम लावण्यात आलेले नाही. ...
उच्चभ्रू वसाहतीत स्वस्तात घर घेण्याच्या नादात एक कुटुंब रस्त्यावर आले आहे, तर अमेरिकेतील एनआरआयने वडिलोपार्जित ८ किलो सोने गमावल्याची घटना अंधेरीत उघडकीस आली. ...