कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत दोनवेळा दोघांनीही दूरध्वनीद्वारे चौकशी केली. ...
नेट बिलिंग, ग्रिड आधार शुल्क, विम्याची अट, आदी स्वरूपातील २५ मेगावॅट सौर अनुदान निविदा प्रस्ताव महावितरणने आणला आहे. ही निविदा सौर यंत्रणांना (सोलर) मारक ठरणारी आहे. त्यामुळे या निविदा प्रस्तावावर महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनकडून (मास्मा) ...
दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आर. के. नगर ते भारती विद्यापीठ रस्त्यावर बेघर वसाहतीनजीक घडली. सर्वेश मुरलीधर कुलकर्णी (वय २१, रा. स्वामी समर्थनगर, बाबा जरगनगर) व शुभम राजकुमार माने (२१, रा. म्हसवडे, ता. माण, जि. ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या चोवीस तासांत २६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ४७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार ७३५ वर जाऊन पोहोचली असून, २९ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
लाच प्रकरण घडण्यापूर्वी आठवडाभर अगोदर याच मटका प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याने सुमारे सव्वा लाखाचा हात मारल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह पोलीस खात्याने खोलवर जाऊन चौकशी करण्याची गरज आहे. ...
माझे कुटुंब - माझी जबाबदारी या शासनाच्या सर्वेक्षणाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून एका आठवड्यामध्ये १७ लाख ८६ हजार ९६४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातून २२०४ जणांनी पुढील उपचार आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले असून, १४८ जणांच्या स्रावच ...