महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा मंजूर निधी कमी पडल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून वरचे पैसे मागण्यावर आक्षेप घेतल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेविना एका युवकाचा मृत्यू झाला. ...
वेगवेगळ्या कारणांनी अलिकडे हायपरटेंशनची समस्या अधिक होत आहे. हृदयाचं मुख्य काम आहे धमण्यांच्या माध्यमातून ऊर्जा आणि ऑक्सिजन देण्यासाठी शरीरात सगळीकडे ब्लड पंप करणे. ...
अनेक तरुणांना शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. मात्र अशा प्रकारे कुटुंबापासून दूर राहणे तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. ...
गेल्या वर्षी २०१७-१८ मध्ये राज्यभरात ७४ लाख ७७ हजार १०१ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यातील २ लाख ६ हजार ९४५ रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचे समजते. ...
तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने या दवाखान्यांना अवकळा आली आहे़ कारेगाव, चिचोंली, करखेली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शौचालय बंद अवस्थेत असून जारीकोट व धर्माबाद पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारती मोडकळीस आली आहे़ ...
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सेवेत असलेल्या डॉक्टर्स ते शिपाई अशा एकूण ८३९ अधिकारी व कर्मचा-यांचे पगार गेले काही महिने सातत्याने किमान एक महिन्याच्या विलंबाने होत आहेत. ...
भारतात प्रत्येक नववी व्यक्ती उच्च रक्तदाब म्हणजे ‘हायपरटेन्शन’च्या विळख्यात आहे. कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक आढळून येणाऱ्या आजाराला 'सायलंट किलर' म्हणूनही ओळखले जाते. मेंदू, डोळे, हृदय, मूत्राशय अशा जवळपास सर्वच अवयवांवर या आजाराचा अप्रत्यक्ष परिणाम ...