पुणे शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून रस्त्यामधले खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांनी पुणेकर त्रस्त झालेले दिसत आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने त्यातून दिवसभर पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता. ...
कित्येक वर्षांपासून एका पुलाअभावी पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १५ ते २० गावांना बारमाही संपर्काचे स्वप्न दाखविणाऱ्या येरमणार नाल्यावरील ‘भीम सेतू’ या पुलाला तांत्रिक चुकांचे ग्रहण लागले. ...
मागील पाच दशकांपासून पुलाची मागणी होत असलेल्या सोनी-आवळी नदी पात्रात अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलिकडच्या आवळी येथे सात दिवसांपासून अडकलेले सहा ट्रॅक्टर रॉकेलच्या रिकाम्या २१ ड्रमवर मांडून चक्क दुथडी नदी पार करण्यात आले. ...
अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या कोरपना व राजुरा या तालुक्यातील गावांना ना. हंसराज अहीर यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. ...
शहरात पाच व सहा जुलै रोजी मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे सकाळी अल्प पाणी असणाऱ्या वणा नदीला दुपारी अचानक पूर आला होता. या पुरात आजूबाजूचा परिसर जलमय झाला. ...
रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रोह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी गेल्या चार दिवसांत पाच वेळा ओलांडली आहे. ...