“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:56 IST2026-05-13T16:54:19+5:302026-05-13T16:56:51+5:30

CM Devendra Fadnavis On NEET 2026 Paper Leak Case: जो तपास आणि कारवाई सुरू आहे, ती जास्तीत जास्त सखोल व्हावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

cm devendra fadnavis first big reaction on neet 2026 exam cancelled and paper leak case said action should be taken against whoever is involved | “जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट

“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट

CM Devendra Fadnavis On NEET 2026 Paper Leak Case: नीट परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची सीबीआय चौकशी करत आहे. आम्ही पूर्ण सहकार्य करू. जो या प्रकरणात सामील असेल, त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. पेपरफुटीमुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ही परीक्षा आता नव्याने घेतली जाणार आहे. याचा फटका २३ लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे.

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. आमचे पोलीस सीबीआयला पूर्ण सहकार्य करतील. नीट पेपर लीक प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतल्याबाबत भारत सरकार आणि नीट परीक्षा घेणाऱ्या संस्थेचे आभार मानतो. विद्यार्थी या परीक्षांसाठी खूप मेहनत घेतात, अभ्यास करतात. असे असताना कोणी पेपर लीक करेल, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

तपासाला आम्ही पूर्ण सहकार्य करू

जो तपास आणि कारवाई सुरू आहे, ती जास्तीत जास्त सखोल व्हावी. ज्या-ज्या व्यक्ती यात सामील असतील, त्या सर्वांवर कारवाई व्हायला हवी. यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, नीट परीक्षा रद्द होणे दुर्दैवी आहे. याचा तपास सीबीआय योग्य पद्धतीने करेल. या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

दरम्यान, नीट यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच महाराष्ट्रातील काही खासगी क्लासमध्ये मिळाले होते. एका खासगी क्लासने परीक्षेपूर्वी काही दिवस आधी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेतली होती. यामध्ये नीट यूजी परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न देण्यात आले होते. अशाच क्लासने घेतलेल्या सराव परीक्षेत ३०० प्रश्न विचारण्यात आले होते. यातील १२० प्रश्न हे नीट यूजी परीक्षेत आले होते, अशी माहिती एका समुपदेशकाने दिली.

Web Title : "शामिल सभी पर कार्रवाई": नीट पेपर लीक पर सीएम फडणवीस

Web Summary : सीएम फडणवीस ने नीट पेपर लीक की सीबीआई जांच में पूर्ण सहयोग का आश्वासन दिया। उन्होंने शामिल सभी लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई पर जोर दिया। नीट यूजी 2026 परीक्षा रद्द, 23 लाख छात्र प्रभावित। डिप्टी सीएम शिंदे ने भी किसी को नहीं बख्शने की गारंटी दी।

Web Title : "Action for all involved": CM Fadnavis on NEET paper leak

Web Summary : CM Fadnavis assures full cooperation in the CBI probe of the NEET paper leak. He insists on strict action against all those involved. The NEET UG 2026 exam was canceled, impacting 2.3 million students. Deputy CM Shinde also guarantees no leniency.