बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असलेली दीपिका अलीकडे कुठल्याशा मुद्यावरून ट्रोल झाली. या ट्रोलरने केवळ ट्रोल केले नाही तर दीपिकाला अगदी थेट मॅसेज करून शिव्या घातल्या. ...
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आज आघाडीच्या अभिनेत्रांमध्ये गणली जाते. इतकेच काय तर सगळ्यात महागडी अभिनेत्री म्हणूनही ती आज ओळखली जाते. पण दीपिकाप्रमाणेच तिची बहीण अनिशानेदेखील तिच्या क्षेत्रात नाव कमावले आहे. ...