देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यातून दिल्लीला गेल्यास तीन दिवस झालेत. निरीक्षक दिल्लीला परतल्यास दोन दिवस पूर्ण होतील. बुधवारी ते आपला अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देतील, असे म्हणतात. त्यानंतर अमित शहा म्हणे पर्रीकरांची भेट घेतील. ...
अलीकडच्या काळात काही घटना अन् सरसंघचालकांची सूचक विधाने यांचे बारकाईने अवलोकन केले, तर संघामध्ये केवळ गणवेशाचेच नव्हे, तर वैचारिक परिवर्तनही घडत असल्याची किंचितशी प्रचिती येते. ...
येणारी लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीची तयारी प्रमुख पक्षांकडून सुरु झाली आहे. भाजपा, काँग्रेसकडून सदस्य नोंदणीसह मतदार नोंदणीचा आढावा घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर केला जात आहे. काँग्रेसच्या ‘शक्ती अॅप’ द्वारे सदस्य नोंदणी मोहीम रा ...