देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अकोला : युवक काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, या निवडणुकीत विजयी झालेल्या प्रदेश पदाधिकारी तथा जिल्हाध्यक्षांचा मुंबई येथील प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे गौरव करण्यात आला. ...
कोरेगाव-भीमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपने काँग्रेस आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा हल्ला केला आहे. ‘‘ मूर्खांचे नंदनवन म्हणजे ‘काँग्रेस’ अशा परखड शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ...
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली असून अद्यापही हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ...
केंद्रातील मोदी सरकार खोटारडे आहे, चौकीदार भ्रष्टाचारात भागीदार झाला आहे, राफेल घोटाळा हा भाजपाच्या भ्रष्टाचारी कारभाराचा स्पष्ट पुरावा आहे, आता हे सरकार उलथवण्याची वेळ आली आहे, ...