देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेसने दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
३० जानेवारी रोजी अखिल भारत हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी अलीगड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून शौर्य दिवस साजरा केला. याच दिवशी नथुराम गोडसेनी महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. देशासाठी बलिदान देणा-या राष्ट्रपित् ...
आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले असून विरोधकांना कुत्रे संबोधून त्यांनी राजकीय संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर आणला आहे. ...