CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर

MI विरुद्ध पदार्पणात धमक दाखवली, पण...

By सुशांत जाधव | Updated: May 4, 2026 01:04 IST2026-05-04T00:55:59+5:302026-05-04T01:04:16+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Big Blow For CSK Ramakrishna Ghosh Ruled Out Of IPL 2026 Due To A Fracture In His Right Foot | CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर

CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर

IPL 2026 Big Blow For CSK Ramakrishna Ghosh Ruled Out Of IPL 2026 : आयपीएल २०२६ स्पर्धेत दुखापतीच्या धक्क्यातून सावरत ट्रॅकवर आलेल्या चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्पर्धा अंतिम टप्प्याकडे सरकत असताना चेन्नईच्या ताफ्यात MI विरुद्ध पदार्पणात चमकेलेल्या युवा गोलंदाजावर उर्वरित स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली आहे. CSK च्या संघाचा उदयोन्मुख ऑलराउंडर रामकृष्ण घोष दुखापतीमुळे उर्वरित हंगामाला मुकणार आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने अधिकृत निवेदन जारी करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नेमकं काय झालं?

चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत निवेदनानुसार, रामकृष्ण घोषच्या उजव्या पायला फ्रॅक्चर झाले आहे. ही दुखापत त्याला २ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे तो आता उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही.

नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील

MI विरुद्ध पदार्पणात धमक दाखवली, पण...

नाशिकमध्ये जन्मलेला २८ वर्षीय क्रिकेटर देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतो. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासह सूर्यकुमार यादवची महत्त्वपूर्ण विकेट मिळवत त्याने दमदार पदार्पण केले. पण हाच सामना त्याच्यासाठी या हंगामातील शेवटचा सामना ठरला. 

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी

रामकृष्ण घोष देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या शानदार कामगिरीसाठी ओळखला जातो. मागील वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने ७ विकेट्स घेत इतिहास रचला होता. त्या सामन्यात त्याने ९.४ षटकांत ४२ धावा खर्च करत त्याने  ७ विकेट्सचा डाव साधला होता. याशिवाय मुंबईविरुद्ध २७ चेंडूत ६४ धावांची स्फोटक खेळी करत त्याने फलंदाजीतील धमकही दाखवली होती. CSK साठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं गरजेचे आहे. या परिस्थितीत उपयुक्त खेळाडू संघाबाहेर झाल्यामुळे येलो आर्मीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

CSK च्या ताफ्यात दुखापतीचं 'ग्रहण'

यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला एकापाठोपाठ एक धक्के बसल्याचे पाहायला मिळाले. आधी नॅथन एलिस संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला. त्यानंतर वेगवान गोलंदाज खलील अहमदही दुखापतीमुळे बाहेर पडला. फलंदाजीत आयुष म्हात्रेच्या रुपात संघाला मोठा धक्का बसला होता. त्यात आता रामकृष्ण घोषच्या नावाची भर पडली आहे.
 

Web Title : CSK को झटका: ऑलराउंडर रामकृष्ण घोष IPL 2026 से बाहर

Web Summary : चेन्नई सुपर किंग्स को बड़ा झटका लगा है क्योंकि ऑलराउंडर रामकृष्ण घोष पैर में फ्रैक्चर के कारण IPL 2026 से बाहर हो गए हैं। यह चोट उन्हें मुंबई इंडियंस के खिलाफ मैच के दौरान लगी। उन्होंने पदार्पण में अच्छा प्रदर्शन किया था।

Web Title : CSK setback: All-rounder Ramakrishna Ghosh ruled out of IPL 2026

Web Summary : Chennai Super Kings faces another blow as all-rounder Ramakrishna Ghosh is ruled out of IPL 2026 due to a foot fracture sustained during a match against Mumbai Indians. He had an impressive debut but will miss the rest of the season.