चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 23:08 IST2026-05-03T23:07:18+5:302026-05-03T23:08:41+5:30

फलोदी सट्टाबाजाराच्या ताज्या संकेतांनुसार पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणूका अत्यंत चुरशीच्या झाल्याचे चित्र आहे. पुढे आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना धक्का बसण्याची आणि भाजपाची सरशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

Four state elections Speculation is rife in American polymarkets including Phalodi; Most bets on Bengal, thorny clash between BJP-Trinamool | चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'

चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'

नरेश डोंगरे -

नागपूर : देशातील चार राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल अवघ्या काही तासात लागणार आहेत. हे निकाल 'कॅश' करण्यासाठी भारतातील ठिकठिकाणच्या सट्टा बाजारासह अमेरिकेच्या सट्टा बाजारानेही जोरदार डावबाजी चालविली आहे. विशेष म्हणजे, बहुचर्चित फलोदी, दिल्ली, मुंबईसह सट्टा बाजारासह अमेरिकेच्या पॉलीमार्केटमध्येही प. बंगालमधील निवडणूकीची धूम आहे. सटोेड्यांच्या मते चार पैकी सर्वाधिक सट्टा बंगाल विधानसभेच्या निवडणुकांवर लागला आहे.

भारतात बहुतांश प्रांतात त्या-त्या ठिकाणचे सट्टा बाजार फेमस असले तरी सर्वाधिक विश्वासू आणि लोकप्रिय सट्टाबाजार म्हणून फलोदीचे (राजस्थान) येते. या सट्टा बाजारातील आकडे अचूक असल्याने लाखो सटोडे या आकड्यांवर विश्वास ठेवून लगवाडी-खयवाडी करतात. चार राज्याच्या विधानसभांच्या निवडणूकांवर कोट्यवधींच्या सट्ट्याची खयवाडी करण्यासाठी दिल्ली, मुंबई, इंदोर आणि नागपूरसह ठिकठिकाणच्या बुकींनी दुकान सजविले आहे. सोबतच यावेळी अमेरिकन ऑनलाइन प्रेडिक्शन प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन सट्ट्याची जबरदस्त चलती असल्याचे सटोडे सांगतात. 

फलोदी सट्टाबाजाराच्या ताज्या संकेतांनुसार पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणूका अत्यंत चुरशीच्या झाल्याचे चित्र आहे. पुढे आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना धक्का बसण्याची आणि भाजपाची सरशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्ष १४५ ते १५० जागांपर्यंत -
सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्ष १४५ ते १५० जागांपर्यंत आणि तृणमूल काँग्रेस १४० ते १४४ मजल मारू शकतो. अर्थात, येथे हे दोनच पक्ष सत्तेची चावी मिळवू शकतात आणि उर्वरित काँग्रेस, सीपीएम आणि अन्य पक्ष सट्टा बाजाराने नगन्य ठरविले आहे. या आकड्यांमुळे पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराच्या शक्यतांवर जास्त भर दिला जात आहे.

पॉलीमार्केटमध्ये बंगाल -
पश्चिम बंगाल निवडणुकीची अमेरिकेतील ऑनलाइन प्रेडिक्शन प्लॅटफॉर्म पाोलिमार्केटवर, अर्थात या अमेरिक सट्टा बाजारात मोठी धूम आहे. या निवडणुकीच्या निकालांवर सुमारे ४.८ मिलियन डॉलर्सचा सट्टा लावला गेल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय जनता पक्षाला सुमारे ५६ टक्के समर्थनासह भक्कम आघाडी -
येथील सध्याच्या ट्रेंडनुसार भारतीय जनता पक्ष सुमारे ५६ टक्के समर्थनासह भक्कम आघाडी घेताना दिसून येत आहे. तर, तृणमूल काँग्रेस ४३ टक्के जागांच्या अवतीभवती असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या फलाटावरील सट्टेबाजीतही काँग्रेससह अन्य पक्षाला स्थान नसल्याचे चित्र आहे. 

Web Title : चुनाव सट्टा: बंगाल वैश्विक सट्टा बाजारों में सबसे आगे

Web Summary : विधानसभा चुनाव परिणामों से भारत और अमेरिका में सट्टेबाजी तेज। बंगाल चुनाव में सबसे अधिक सट्टा, भाजपा और टीएमसी में कड़ी टक्कर। फलोदी बाजार ने भाजपा के मजबूत होने के संकेत दिए, जिससे ममता बनर्जी की सरकार को चुनौती मिल सकती है। ऑनलाइन प्लेटफार्मों पर भाजपा आगे।

Web Title : Election Bets Surge: Bengal Hot Pick in Global Betting Markets

Web Summary : Assembly election results fuel betting frenzy in India and the US. Bengal elections draw maximum bets, with a tight race between BJP and TMC. Falodi market hints at BJP gaining ground, potentially challenging Mamata Banerjee's rule. Online platforms show BJP leading.