देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांना शुक्रवारी एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. ...
काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या असून पुण्यातील काॅंग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहिली आहेत. ...
लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य घटकपक्षांसाठी एकूण सहा जागा सोडण्याची आघाडीची तयारी आहे. ...
राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी बार्देस तालुक्याचे महत्त्व काँग्रेस पक्षाने ओळखल्याने तालुक्यातून गमावलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाला तालुक्यातून मजबूती देण्याचे तसेच पक्षबांधणीचे ...