देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अनेक जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मोठ्या नेत्यांच्या ड्रायव्हरकडे सोपविण्यात आल्याचे वास्तव प्रियंका यांच्यासमोर आले आहे. वाराणसी विभागातील एका जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोठ्या नेत्याचा ड्रायव्हर असल्याचे प्रियंका यांना सांगण्यात आले ...
राहुल यांनी पक्षाचे उत्तम पद्धतीने नेतृत्व केले. काँग्रेसला त्याचा लाभ घेता आला नाही. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल अशी स्थिती राहुल यांनी निर्माण केली होती. त्यांचं नेतृत्व निवडणुकीच्या वेळी आणि निवडणुकीपूर्वी चांगले होते तर आता का नाही, असा सवालची मो ...
काँग्रेसचा लोकसभेतील नेता ठरविण्यात आलेला नाही. याचा निर्णय पक्ष नेतृत्वाकडे प्रलंबित आहे. मात्र पश्चिम बंगालचे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि केरळचे के. सुरेश यांच्यापैकी एका नेत्याची काँग्रेसच्या लोकसभेच्या नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...