MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास

IPL 2026: मुंबईविरुद्ध काल खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने इतिहास रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:24 IST2026-04-17T11:22:08+5:302026-04-17T11:24:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MI vs PBKS: The ground belongs to Mumbai and the score belongs to Punjab! Shreyas Iyer's team created big history at Wankhede | MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास

MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास

आयपीएल २०२६ च्या २४ व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह पंजाबच्या संघाने इतिहासाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धपंजाब किंग्सचा हा १८वा विजय ठरला आहे. शिवाय, आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारा संघ आता पंजाब किंग्ज बनला आहे.

आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर एमआयविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आता पंजाब किंग्जच्या नावावर जमा झाला आहे. या मैदानावर, पंजाबने खेळलेल्या ११ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या तुलनेत, चेन्नई सुपर किंग्सने या मैदानावर खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पाच वेळा हरवले आहे. आरसीबीने देखील या मैदानावर हा पराक्रम पाच वेळा केला आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाने या स्टेडियमवर खेळलेल्या नऊ सामन्यांमध्ये मुंबईचा चार वेळा पराभव केला आहे.

वानखेडेवर मुंबईविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे संघ:

क्र.संघएकूण सामनेविजय
पंजाब किंग्ज११
चेन्नई सुपरकिंग्ज१३
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू१३
राजस्थान रॉयल्स


आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध एकूण सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांचा विचार करता, पंजाब किंग्सने आता चेन्नई सुपर किंग्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. आजवर पंजाब आणि चेन्नई या दोन्ही संघांनी मुंबईचा प्रत्येकी १८ वेळा पराभव केला. पंजाबने हा पराक्रम ३५ सामन्यांमध्ये साध्य केला, तर चेन्नई संघाला हा टप्पा गाठण्यासाठी ३९ सामने खेळावे लागले. या यादीत दिल्ली कॅपिटल्स तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांनी ३८ सामन्यांमध्ये मुंबईचा १७ वेळा पराभव केला. दरम्यान, आरसीबीने ३५ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला १६ वेळा हरवले आहे. 

आयपीएल: मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे संघ:

क्र.संघएकूण सामनेविजय
पंजाब किंग्ज३५१८
चेन्नई सुपरकिंग्ज३९१८
दिल्ली कॅपिटल्स३८१७
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)३५१६
राजस्थान रॉयल्स३११५

मुंबईचा दारूण पराभव

आयपीएल २०२६ च्या २४ व्या सामन्यात पंजाब किंग्सने यजमान मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. मुंबईने विजयासाठी दिलेले १९६ धावांचे मोठे आव्हान पंजाबने अवघ्या १६.३ षटकांत पूर्ण केले. या विजयासह पंजाब किंग्स आता गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचले असून, मुंबई इंडियन्सची घसरण सुरूच आहे.

Web Title : पंजाब किंग्स ने वानखेड़े में मुंबई को हराया, आईपीएल में रचा इतिहास

Web Summary : पंजाब किंग्स ने मुंबई इंडियंस को 7 विकेट से हराया, आईपीएल में एमआई के खिलाफ अपनी 18वीं जीत हासिल की। अब वे वानखेड़े स्टेडियम में मुंबई के खिलाफ सबसे ज्यादा जीत हासिल करने वाली टीम बन गए हैं, चेन्नई सुपर किंग्स और रॉयल चैलेंजर्स बैंगलोर से आगे। पंजाब ने आईपीएल इतिहास में एमआई के खिलाफ सबसे ज्यादा कुल जीत के मामले में सीएसके की बराबरी भी की।

Web Title : Punjab Kings Dominate Mumbai at Wankhede, Create History in IPL

Web Summary : Punjab Kings defeated Mumbai Indians by 7 wickets, achieving their 18th win against MI in IPL. They now hold the record for most wins against Mumbai at Wankhede Stadium, surpassing Chennai Super Kings and Royal Challengers Bangalore. Punjab also equals CSK for most total wins against MI in IPL history.