सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:07 IST2026-04-17T10:53:55+5:302026-04-17T11:07:55+5:30

पत्नीला घरात ठेवण्याच्या कारणावरून पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईचा खून केल्याचा प्रकार मिरजेत घडला.

Miraj Son Kills Mother Following Dispute Over Bringing Wife Home Arrested by Kupwad Police | सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य

सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य

Sangli Crime: मिरजेतील मानमोडी येथे पत्नीला घरात ठेवण्याच्या कारणावरून पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. संगीता जीवन झेंडे (वय ५१, रा. ड़झेंडे मळा, मानमोडी, ता. मिरज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खुनानंतर संशयित पसार झाला. कुपवाड पोलिसांनी काही तासांतच संशयिताचा शोध घेऊन अटक केली. जगदीश जीवन झेंडे (वय २८, रा. झेंडे मळा, मानमोडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

फिर्यादी बजरंग काशिद यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांची बहीण मृत संगीता झेंडे या पती व मुलगा असे तिघेजण मानमोडी येथील झेंडे मळ्यात राहतात. बुधवारी सायंकाळी बहिणीचे पती जीवन झेंडे हे रात्रपाळीला कामावर गेले होते. मृत संगीता व त्यांचा मुलगा जगदीश हे दोघेच घरात होते.

जगदीश याची पत्नी सोनाली हिला घरात ठेवण्याच्या कारणावरून मायलेकांत भांडण झाले. रागातून संशयित जगदीश याने घरात कोणीही नसल्याचे पाहून संगीता हिचे तोंड, नाक, गळा दाबत खून केला. खुनानंतर संशयित पसार झाला. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मृत संगीता हिचे पती जीवन झेंडे हे रात्रपाळी कामावरून घरी आल्यावर खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी पोलिस फौजफाटा सोबत घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून संशयिताच्या शोधासाठी पोलिस रवाना केले. पोलिसांनी तातडीने संशयित जगदीश याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. कुपवाड पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली पोलिसांना दिली.
 

Web Title : सांगली में सनसनी: पत्नी के घर में रहने पर बेटे ने माँ की हत्या की

Web Summary : सांगली में, पत्नी के घर में रहने को लेकर हुए विवाद में एक बेटे ने अपनी माँ की हत्या कर दी। घटना मिरज के मानमोडी में हुई। पुलिस ने संक्षिप्त खोज के बाद संदिग्ध जगदीश को गिरफ्तार कर लिया। चौंकाने वाला अपराध तब सामने आया जब पीड़िता का पति काम से घर लौटा।

Web Title : Sangli Shaken: Son Murders Mother Over Wife's Stay at Home

Web Summary : In Sangli, a son murdered his mother due to a dispute over his wife staying at their home. The incident occurred in Manmodi, Miraj. Police arrested the suspect, Jagdish, after a brief search. The shocking crime was discovered when the victim's husband returned home from work.