देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कोरोनामुळे राजधानी दिल्लीत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती. ...
विलासराव देशमुख नेहमी सांगायचे की, विरोधी पक्षाबरोबर आपल्याला पक्षातील विरोधकांशी दोन हात करावे लागतात. सत्तेचे माप पदरात न पडलेले काँग्रेसमधील काही नेते अस्वस्थ असून, तेच दिल्लीत विद्यमान सरकारमध्ये काँग्रेसच्या डावलले जाण्याच्या तक्रारी करीत आहेत. ...
काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक मुंबईत गुरुवारी झाली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व अन्य नेतेही या बैठकीला हजर होते. ...
काँग्रेसच्या या नाराजीनंतर महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली असल्यचा टोला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी लगावला आहे. ...