देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काही जणांकडून यात मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्याचा प्रकार केला आहे. विरोधकांच्या या आरोपाला महाराष्ट्र युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उत्तर दिलं आहे. ...
राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती कमलनाथ यांनी दिली. ...
एकीकडे काँग्रेसचे नेते मंदिराच्या भूमिपूजनावरून सत्ताधारी भाजपावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून राम मंदिराला समर्थन दिले आहे. ...
कोरोना संक्रमण टाळण्यासाठी आमदारांनी दिलेल्या निधीच्या खर्चावरून काँग्रेस व राष्ट्रवादीतच कलगीतुरा रंगला आहे. निधी खर्चच झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख यांनी केला होता. तर देशमुखांच्या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे आरोग्य सभापती क ...