देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी, ‘शिवसेनेने वा राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची भाषा कधीही केलेली नाही. आम्ही एकत्र लढलो तर चमत्कार होईल,’ अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ...
भाजपमध्ये गेल्यानंतर सुनील देशमुख यांनी अमरावतीत ७ नगरसेवकांपासून ४५ नगरसेवकांपर्यंत भाजपचा विस्तार केला. पण, कोणती पदे कोणाला द्यायची यासाठी नागपूरला विचारावे लागत असे. पक्षाच्या कोअर बैठकीमध्ये फारसे स्थान नव्हते. ...
चौहान यांच्या दिल्ली दौऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवरुन चांगलच राजकारण सुरू आहे. काँग्रेसकडून या भेटीचे फोटो व्हायरल करुन चौहान यांना डिवचण्यात येत आहे. ...