राज्यात मध्यावधी निवडणुका? १०० मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची फिल्डिंग; ‘सुपर १००’ मोहिम हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 09:18 PM2021-06-17T21:18:41+5:302021-06-17T21:20:51+5:30

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादी निवडणूक लढवतील असं सांगितलं आहे.

Midterm elections in the state? NCP fielding for 100 constituencies; 'Super 100' campaign underway | राज्यात मध्यावधी निवडणुका? १०० मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची फिल्डिंग; ‘सुपर १००’ मोहिम हाती

राज्यात मध्यावधी निवडणुका? १०० मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची फिल्डिंग; ‘सुपर १००’ मोहिम हाती

Next
ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे असं चित्र दिसत नाही. एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यात दौरा करून आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं महाविकास आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरं जावं असं म्हटलं आहे. यातच आत शिवसेनेने काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणूक लढवेल असं सांगितले आहे.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादी निवडणूक लढवतील असं सांगितलं आहे. भाजपाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुपर १०० मोहिम हाती घेतली आहे.

काय आहे सुपर १०० मोहिम?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेने राज्यात सुपर १०० मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत ३४ विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे ३४ पदाधिकारी राज्यातील १०० मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रैस मजबूत करण्याचं काम करतील. राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडलेले हे १०० मतदारसंघ असे आहेत ज्याठिकाणी राष्ट्रवादी मागील निवडणुकांमध्ये नंबर दोन आणि तीन क्रमांकावर होती. त्यामुळे या मतदारसंघातील संघटनात्मक पातळीवर मजबुती आणण्याची जबाबदारी युवक कार्यकर्त्यांना सोपवली आहे.

कोरेगाव, पाटण, कुर्ला, कर्जत, जळगाव शहर, चाळीसगाव, एरंडोल, पाचोरा, बाळापूर, मुर्तीजापूर, कारंजा, मेळघाट, हिंगणघाट, हिंगणा, तिरोडा, डिग्रस, किनवट, लोहा, जिंतूर, गंगाखेड, बदनापूर, भोकरदन, कन्नड, औरंगाबाद(मध्य), पैठण, गंगापूर, वैजापूर, नांदगाव, बागलान, नाशिक(पश्चिम), भिवंडी ग्रामीण, मुरबाड, उल्हासगर, कल्याण पूर्व, ऐरोली, बेलापूर, मागाठणे, विक्रोळी, भोसरी, चिंचवड, चोपडा, जळगाव ग्रामीण, खडकवासला, पर्वती, शेगाव, श्रीगोंदा, गेवराई, केज, उस्मानाबाद, परंडा, बार्शी, सोलापूर शहर (उत्तर), माळशिरस, पंढरपूर, सिंदखेड, जामनेर, माण-खटाव, सातारा, दापोली, गुहागर, रत्नागिरी, सावंतवाडी, राधानगरी, करमाळा, दौंड आणि दिंडोशी या  मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत दर ३ महिन्यांनी या मतदारसंघाचा कार्य अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

जयंत पाटील काय म्हणाले?

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने 'सामना' ने मत व्यक्त केले आहे मात्र महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सध्या पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत असतील. प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे. हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणून तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे. निवडणूका जवळ आल्यावर कदाचित ते वेगळा विचार करु शकतील पण त्यांनी तसा विचार केला नाही तर मग जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील असं त्यांनी सांगितले.

Web Title: Midterm elections in the state? NCP fielding for 100 constituencies; 'Super 100' campaign underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.