हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (22 जानेवारी) झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...
सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राबर्ट वढेरा, अहमद पटेल या पंचकपासून देश मुक्त करा, असे बाळासाहेब त्यावेळी म्हणाले होते; मात्र सध्या डोळ्यासमोर काही वेगळीच परिस्थिती आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. पण या सिनेमाला आता संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. ...
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपट पोस्टर रिलीजपासूनच चर्चेत आहे. पोस्टर्सनंतर टीझर, ट्रेलर आणि आता म्युझिक लाँचिंग सोहळ्यानंतरही बाळासाहेब आणि नवाजची चर्चा रंगली आहे. ...