शेतकऱ्यांकडे एक-दोन टक्केच साठवलेला कापूस शिल्लक असून अनेक ठिकाणी यंदा कापसाची अजूनही काढणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कापसाच्या किंमती वाढतील ही अपेक्षा असून कापसाचे संभाव्य बाजारभाव काय असतील? याची उत्सुकता आहे. ...
साठवणुकीची चांगली सोय नसल्याने काढणीनंतर शेतकऱ्यांना कांदा तत्काळ विकावा लागतो. शीतगृहांच्या साखळीसोबतच कांदा लागवड ते काढणीपर्यंतचे योग्य व्यवस्थापन केले, तर कांदा बाजारभावाच्या समस्येवर तोडगा निघू शकतो. ...
सध्या बाजारात नवीन कांद्याची आवक एकदम कमी असल्याने दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ८० रुपये किलोपर्यंत कांदा असून दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दरात हळूहळू घसरण सुरू होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
कांदा बाजारभाव पाच हजारांवरून बुधवारी ६००० रुपये आणि गुरुवारी ७००० रुपयांचा भाव मिळाला. शनिवारी मात्र चक्क दर ८५०० रुपयांवर पोहोचला. बुधवारपासून चार दिवसांतच कांद्याच्या दरात तब्बल साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. ...
कांद्याचे भाव नियंत्रणासाठी केंद्राने निर्यात होणाऱ्या कांद्याचे किमान निर्यात मूल्य ८०० डॉलर केले आहे. मात्र त्याचा शेतकऱ्यांकडील कांदा बाजारभावावर परिणाम होणार नसल्याचे सांगितले जातेय. ...