आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण पुढे करून आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला आधीच कात्री लावली आहे. त्यानंतरही सत्तापक्षाने मवाळ भूमिका घेतली आहे. पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवकच नव्हे तर तीन ते चारवेळा निवडून आलेल्या नगरसेवक ...
शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही महापालिका रस्त्याची कामे करीत नसल्याने आ. डॉ.राहुल पाटील यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून मनपाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात यज्ञ केला. या आंदोलनामुळे शहरातील रस्त्यांचा प्रश्न चर्चेला आला आहे. ...
महामेट्रोमध्ये वैदर्भीय तरुणांनाच रोजगार देण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर युवा आघाडी व शहर युवा टायगर फोर्सचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी महामेट्रोच्या सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
अकोला : कृषी विभागाचे तांत्रिक काम असलेल्या पीक कापणी प्रयोगावर ग्रामसेवकांनी ऐनवेळी बहिष्कार टाकल्याने अडचणीत आलेल्या शासनाने खरिपातील प्रयोगाचे अहवाल द्या, रब्बी हंगामासाठी नव्याने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याने ग्रामसेवक युनियनने बहिष्कार ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...