निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 07:08 IST2026-05-13T07:07:53+5:302026-05-13T07:08:44+5:30

"सुडबुद्धीची कारवाई?" एमआयएमचा आरोप; खंडपीठाने दिलासा नाकारल्यानंतर महापालिकेची तीन जेसीबीसह धडक कारवाई.

Nida Khan was given shelter, MIM corporator Matin Patel's properties were bulldozed by Chh. Sambhajinagar Municipal Corporation | निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'

छत्रपती संभाजीनगर: नाशिक येथील कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे. महापालिका प्रशासनाने बुधवारी पहाटे ६:१५ वाजता नारेगाव परिसरातील पटेल यांच्या तीन अनधिकृत मालमत्तांवर बुलडोजर चालवला. या कारवाईमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता.

​मध्यरात्रीचा 'हायव्होल्टेज' ड्रामा
महापालिका कारवाई करणार असल्याचा सुगावा लागताच, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे आपल्या ३४ नगरसेवकांसह आणि हजारो कार्यकर्त्यांसह मध्यरात्री साडेबारा वाजता नारेगावमध्ये दाखल झाले. "ही कारवाई पूर्णपणे राजकीय सुडबुद्धीने सुरू आहे," असा आरोप करत आंदोलकांनी पहाटेपर्यंत तिथेच ठाण मांडले होते. कोणत्याही परिस्थितीत मालमत्तेला हात लावू देणार नाही, अशी भूमिका एमआयएमने घेतली होती.

​प्रशासनाचा वज्रनिर्धार
नगरसेवक मतीन पटेल यांनी महापालिकेच्या नोटिशीला कोणतेही कायदेशीर उत्तर दिले नव्हते, तसेच त्यांनी खंडपीठात धाव घेतली असता त्यांना तेथूनही कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात करत पहाटेच्या सुमारास तीन जेसीबीच्या साहाय्याने ही बांधकामे पाडण्यास सुरुवात केली. विरोधाची धार तीव्र असतानाही प्रशासनाने आपले काम पूर्ण केले.

Web Title : निदा खान को आश्रय देना पड़ा भारी: MIM पार्षद की संपत्तियाँ ध्वस्त

Web Summary : निदा खान को आश्रय देने के आरोपी MIM पार्षद मतीन पटेल पर कार्रवाई हुई। इम्तियाज जलील के नेतृत्व में विरोध के बावजूद अधिकारियों ने उनकी अनधिकृत संपत्तियाँ ध्वस्त कर दीं। पटेल नोटिसों का जवाब देने में विफल रहे और उन्हें अदालत से कोई राहत नहीं मिली।

Web Title : Nida Khan Shelter Backfires: MIM Corporator's Properties Demolished

Web Summary : MIM corporator Mateen Patel, accused of sheltering Nida Khan, faces action. Authorities demolished his unauthorized properties despite protests led by Imtiaz Jaleel. Patel failed to respond to notices and received no court relief.