IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ

CSK, RR आणि KKR अजूनही स्वबळावर टिकून, DC ची डाळ शिजणं 'मुश्किल'

By सुशांत जाधव | Updated: May 13, 2026 07:52 IST2026-05-13T07:49:41+5:302026-05-13T07:52:16+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Points Table Gujarat Titans Snatch RCB Throne Which Teams Are In Top 4 Who Is Where In Playoff Race SRH PBKS CSK RR DC KKR | IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ

IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ

IPL 2026 Points Table  Who Is Where In Playoff Race  :  अहमदाबादच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सनेसनरायझर्स हैदराबादवर ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवत IPL 2026 मध्ये मोठा धमाका केला. या विजयासह शुभमन गिलच्या संघाने १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून प्लेऑफच्या शर्यतीला नवा रंग आला आहे. यंदाच्या हंगामात आघाडीच्या दोनमध्ये राहून क्वॉलिफायर १ खेळत थेट फायनल गाठण्यासाठी GT सह RCB  प्रबळ दावेदार असून प्लेऑफ्सच्या उर्वरित २ जागेसाठी ६ संघ अजूनही शर्यतीत आहेत. इथं जाणून घेऊयात आघाडीच्या चारमध्ये टिकून राहण्यासाठी कोणत्या संघासमोर कसं आहे समीकरण? यासंदर्भातील सविस्तर 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

क्वॉलिफायर १ साठी GT आणि RCB प्रबळ दावेदार

गुजरात टायटन्सच्या संघाने १२ पैकी ४ पराभव आणि ६ विजय मिळवत आपल्या खात्यात १६ गुण जमा केले आहेत. कोलकाता आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्याविरुद्ध उर्वरित दोन सामने जिंकून ते २० गुणापर्यंत पोहचत  अव्वल दोनमधील आपले स्थान भक्कम करण्यास प्रयत्नशील असतील. या संघाशिवाय गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स हा एकमेव संघ आहे जो उर्वरित ३ सामने जिंकून २० गुणांपर्यंत पोहचू शकतो. त्यांच्यासमोर कोलकाता, पंजाब आणि सनरायझर्सचे आव्हान असणार आहे. IPL मध्ये प्लेऑफ्समधील अव्वल दोन संघांमध्ये क्वॉलिफायर १ ची लढत खेळवली जाते. त्यातील विजेता थेट फायनल खेळतो तर पराभूत संघाला क्वॉलिफायर २ मधून फायनल गाठण्याची दुसरी संधी मिळते. हा फायदा घेण्यासाठी सध्याच्या घडीला GT आणि RCB प्रबळ दावेदार असल्याचे दिसते. 

अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी

SRH आणि PBKS चं काय?

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने १२ सामन्यानंतर ७ विजयासह १४ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित दोन सामने जिंकून ते १८ गुणांपर्यंत मजल मारू शकतात. यातील एक सामना जिंकला तरी त्यांच्यासाठी प्लेऑफ्सचा मार्ग सोपा होईल. दुसरीकडे यंदाच्या हंगामात पहिल्या ७ सामन्यात ६ विजय आणि एका अनिर्णत सामन्यात १३ गुण कमावल्यावर पंजाब किंग्सचा संघाचा विजयरथ थांबला आहे. ते उर्वरित ३ सामने जिंकून अजूनही अव्वल दोमध्ये दावेदारी ठोकू शकतात. पण त्याआधी किमान दोन सामने जिंकून ते अव्वल ४ मधील स्थान कायम राखण्यासाठी जोर लावतील. पराभवाची मालिका खंडीत करण्यात अपयश आले तर मोहिमेची दिमाखदार सुरुवात करून त्यांच्यावर स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. 

CSK, RR आणि KKR अजूनही स्वबळावर टिकून, DC ची डाळ शिजणं मुश्किल

चेन्नई सुपर किंग्सने ११ पैकी ६ विजय आणि ५ पराभवासह १२ गुण मिळवले आहेत. त्यांचे अजून तीन सामने बाकी असल्याने प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी कायम आहे. राजस्थान रॉयल्सचीही अशीच स्थिती असून ११ सामन्यांत १२ गुण मिळवत सहाव्या स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२ सामन्यानंतर १० गुण कमावत सातव्या तर कोलकाता नाईट रायडर्स १० सामन्यानंतर ९ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. दिल्लीच्या संघाने सर्व सामने जिंकले तरी १४ गुणांपर्यंतच मजल मारता येईल. त्यांचे भवितव्य हे इतर संघाच्या निकालावर अवलंबून असल्यामुळे ते प्लेऑफ्सच्या शर्यतीत असून नसल्यासारखे आहेत.
 

Web Title : IPL 2026: GT, RCB प्रबल दावेदार; छह टीमें दो स्थानों के लिए प्रतिस्पर्धा।

Web Summary : जीटी और आरसीबी क्वालीफायर 1 के लिए प्रबल दावेदार हैं। शेष दो स्थानों के लिए छह टीमें प्रतिस्पर्धा कर रही हैं। सीएसके, आरआर, केकेआर के पास अभी भी मौके हैं।

Web Title : IPL 2026: GT, RCB favorites; six teams vie for two playoff spots.

Web Summary : GT and RCB are strong contenders for Qualifier 1. Six teams compete for the remaining two playoff spots. CSK, RR, KKR still have chances.