Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 08:10 IST2026-05-13T08:09:31+5:302026-05-13T08:10:45+5:30
Prateek Yadav Passes Away at 38: समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचे निधन झाले आहे.

Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
Prateek Yadav Death: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचे आज निधन झाले. फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतीक यादव यांचा वयाच्या अवघ्या ३८ वर्षी निधन झाल्याने यादव कुटुंबासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
VIDEO | Lucknow, Uttar Pradesh: Mortal remains of Prateek Yadav, younger son of Samajwadi Party founder Mulayam Singh Yadav and step brother of Akhilesh Yadav, being taken for post mortem.
— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2026
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/FrV8MYrGwJ
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने लखनौ येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
प्रतीक यादव हे मुलायम सिंह यादव आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. राजकीय वारसा लाभलेला असतानाही प्रतीक यांनी सक्रिय राजकारणापासून स्वतःला नेहमीच अलिप्त ठेवले. त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधून एमबीए पूर्ण केले होते. राजकारणात येण्याऐवजी त्यांनी रिअल इस्टेट आणि फिटनेस उद्योगाला पसंती दिली. प्रतीक यादव हे फिटनेस फ्रीक म्हणून ओळखले जात. लखनौमध्ये त्यांचा स्वतःचा जिमचा मोठा व्यवसाय आहे.
दरम्यान, २०१७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले होते की, आपल्याला राजकारणात रस नसून व्यावसायिक प्रगतीवरच लक्ष केंद्रित करायचे आहे. पक्षातून अनेकदा त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र त्यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढवली नाही किंवा पक्षात कोणतेही पद स्वीकारले नाही.