नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 08:54 IST2026-05-13T08:52:22+5:302026-05-13T08:54:57+5:30

दहशतवादी संघटनांनी सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून वाचण्यासाठी आता अत्याधुनिक आणि कूटबद्ध मेसेजिंग अ‍ॅप्सचा आधार घेतला आहे.

New 'digital war', messaging app is being used; Shocking information revealed from interrogation of 'Lashkar-e-Taiba' terrorist | नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती

नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती

जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांनी सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून वाचण्यासाठी आता अत्याधुनिक आणि कूटबद्ध मेसेजिंग अ‍ॅप्सचा आधार घेतला आहे. नुकत्याच अटक करण्यात आलेल्या 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरकारच्या अन् जागतिक संस्थांच्या उपाययोजना

अ‍ॅप्सवर बंदी: मे २०२३ मध्ये केंद्र सरकारने गृह मंत्रालयाच्या शिफारशीवरून १४ मेसेजिंग अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

सुरक्षा यंत्रणांचे आव्हान : 'एंड-टू-एंड एन्क्रिप्शन' मुळे रिअल-टाइम माहिती गोळा करणे कठीण होत आहे, ज्यामुळे सायबर सुरक्षा हे मोठे आव्हान बनले आहे.

संयुक्त राष्ट्रे ठराव : दहशतवाद्यांच्या ऑनलाइन प्रचाराला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने २०१७ मध्ये ठराव २३५४ मंजूर केला आहे, जो कायदेशीर उपाययोजना आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीवर भर देतो.

रडारवर असलेली प्रमुख अ‍ॅप्स

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी केवळ व्हॉट्सअ‍ॅप किंवा टेलिग्रामवर अवलंबून नसून खालील अ‍ॅप्सचा वापर करत आहेत:

ब्लॅकबेरी मेसेंजर (बीबीएम) : एकेकाळी अत्यंत सुरक्षित मानले जाणारे हे अ‍ॅप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता 'बीबीएम एंटरप्राइज' या सशुल्क सेवेचा वापर करून दहशतवादी आपल्या नेटवर्कमधील अनेक गटांशी संपर्क साधत आहेत. 

थ्रीमा : हे स्वित्झर्लंडमधील अ‍ॅप आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी फोन नंबर किंवा ईमेलची गरज नसते, ज्यामुळे वापरकर्त्याची ओळख पटवणे अशक्य होते. सुरक्षेला चकवा दिला जातो

एलिमेंट : हे एक विकेंद्रित अ‍ॅप आहे. मे २०२३ मध्ये केंद्र सरकारने यावर बंदी घातली होती, कारण याचा वापर दहशतवादी मॉड्यूलकडून केला जात होता. हल्ल्यांची रणनीती यातून आखली जात होती.

डस्ट : या अ‍ॅपमधील मेसेज वाचल्यानंतर लगेच किंवा २४ तासांच्या आत आपोआप नष्ट होतात, ज्यामुळे पुरावे उरत नाहीत.
 

Web Title : नया 'डिजिटल युद्ध': आतंकवादी मैसेजिंग ऐप्स का उपयोग कर रहे; चौंकाने वाले खुलासे।

Web Summary : जम्मू और कश्मीर में आतंकवादी समूह सुरक्षा एजेंसियों से बचने के लिए एन्क्रिप्टेड मैसेजिंग ऐप्स का उपयोग कर रहे हैं। प्रतिबंधित ऐप्स में एलिमेंट, ब्लैकबेरी मैसेंजर और थ्रीमा शामिल हैं, क्योंकि एंड-टू-एंड एन्क्रिप्शन से रीयल-टाइम ट्रैकिंग मुश्किल हो जाती है। संयुक्त राष्ट्र प्रस्ताव ऑनलाइन आतंकवादी प्रचार का मुकाबला करने पर केंद्रित है।

Web Title : New 'digital war': Terrorists using messaging apps; shocking details revealed.

Web Summary : Terrorist groups in Jammu & Kashmir are using encrypted messaging apps to evade security agencies. Banned apps include Element, Blackberry Messenger and Threema due to end-to-end encryption making real-time tracking difficult. UN resolution focuses on combating online terrorist propaganda.