रेशन धान्य मिळत नसल्याने तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रुटीमुळे अन्याय झालेल्या नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करुन आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. विविध गावांतील ग्रामस्थांच्या आंदोलनाचा हा आढावा... ...
ईव्हीएमचा मशीनचा वापर बंद करुन बॅलेट पेपरच्या सहाय्याने निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी वसमत रस्त्यावर ईव्हीएम मशीन व मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून, सोमवारी सकाळी खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपोषण करुन वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी रेटून धरली. ...
दिव्यांग ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्यामुळे विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याला घेराव घालून आंदोलन करण्यात आले. दोषी आॅटोचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिव्यांगांनी केली. दरम्यान दुपारी सीताबर्डी पोलिसांन ...
शासनाने कृषिपंपास सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत म्हणजेच दिवसा वीजपुरवठा द्यावा अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष नानाजी आखरे यांनी येथे दिला. ...
पावसाने दडी मारल्याने धान पीक वाळत असून पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडावे, या मागणीसाठी शेतकºयांनी भंडारा- तुमसर राज्यमार्गावर सोमवारी १२ वाजतापासून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. ...