Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 06:00 IST2026-05-13T05:59:01+5:302026-05-13T06:00:25+5:30

वादळी वाऱ्यामुळे बचावासाठी ज्या मंदिराच्या शेडचा आसरा घेतला त्याचीच भिंत जीवघेणी ठरल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Sangli: Temple wall collapses in storm, 6 devotees killed, eight injured after being crushed under rocks | Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी

Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी

उमदी (जि. सांगली) : मोटेवाडी (ता. जत) येथील मरगूबाई मंदिराची भिंत कोसळून मंगळवारी सहा जण ठार झाले. दुर्घटनेत आठ लोक जखमी झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे बचावासाठी ज्या मंदिराच्या शेडचा आसरा घेतला त्याचीच भिंत जीवघेणी ठरल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

मोटेवाडी येथील मरगूबाई मंदिर महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर मंगळवारी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होतात. याठिकाणी नैवेद्य करण्यासाठी मोठे शेड उभारण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी जेव्हा वादळी वारे सुटले तेव्हा सारे भाविक शेडकडे धावले. 

शेडची भिंत कच्च्या स्वरूपाची होती. एका कट्ट्यावर चिराचे दगड उभे करुन सिमेंटने ती भरली होती. पाया मजबूत नसल्याने वादळी वाऱ्यात ही भिंत तग धरू शकली नाही. 

कशी घडली दुर्घटना?

मोटेवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार वादळी वारे सुटले. वारे इतके सुसाट होते की, त्यापासून बचावासाठी परिसरातील काही भाविकांनी मरगूबाई मंदिराकडे धाव घेतली. मंदिराच्या आवारातच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सर्व भाविक उभे होते. त्याच शेडची भिंत अचानक कोसळली.

मृतांमध्ये अरुण विष्णू गेजगे (१४, कर्नाटक), सोन्या लक्ष्मण गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, ता. विजयपूर) आणि कोंडिबा राउबा गेजगे (वय ६५, रा. दारिबडची), शंकर आबा लोखंडे (वय ८०, रा. पांडोझरी, ता. जत), मंगल भाऊसाहेब मोटे (वय ४५) व संगीता रामचंद्र चौधरी (वय ४२, दोघेही रा. टकळगी, ता. विजयपूर, कर्नाटक) यांचा समावेश आहे.

Web Title : सांगली: तूफान में मंदिर की दीवार गिरी, छह भक्तों की मौत

Web Summary : सांगली के मोटेवाड़ी में तूफान के दौरान मंदिर की दीवार गिरने से छह भक्तों की मौत हो गई और आठ घायल हो गए। आश्रय देने वाली दीवार ही घातक साबित हुई, मृतकों में बच्चे भी शामिल हैं। मरगुबाई मंदिर महाराष्ट्र और कर्नाटक के भक्तों का तीर्थ स्थल है।

Web Title : Sangli: Temple wall collapses in storm, six devotees killed.

Web Summary : Six devotees died and eight were injured in Sangli after a temple wall collapsed during a storm in Motewadi. The wall, providing shelter, proved fatal, including children. The Marugubai temple is a pilgrimage site for devotees from Maharashtra and Karnataka.