NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 05:32 IST2026-05-13T05:30:56+5:302026-05-13T05:32:29+5:30

NEET 2026 Latest Updates: ५६५ शहरांमध्ये घेण्यात आली होती परीक्षा; २३ लाख विद्यार्थ्यांनी केली होती परीक्षेसाठी नोंदणी

NEET cancelled; Lakhs of students will have to retake the exam; CBI to investigate paper leak | NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार

NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार

नवी दिल्ली : पेपरफुटीमुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ही परीक्षा आता नव्याने घेतली जाणार आहे. याचा फटका २३ लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे. (NEET UG 2026 Cancelled)
 
केंद्रीय यंत्रणांकडून मिळालेल्या  तपासातील निष्कर्षांचा आढावा घेतल्यानंतर, सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एनटीएने स्पष्ट केले. सीबीआयला चौकशीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन एनटीएने दिले आहे.

सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

एनटीएने यापूर्वी परीक्षा प्रक्रियेत कडक सुरक्षा उपाययोजना केल्याचा दावा केला होता. प्रश्नपत्रिका जीपीएस-ट्रॅकिंग असलेल्या वाहनांमधून वाहतूक करण्यात आल्या होत्या आणि परीक्षा केंद्रांवर एआय-आधारित सीसीटीव्ही निरीक्षण ठेवण्यात आले होते. तरी पेपर फुटले. त्यामुळे नीटच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

पालकांच्या मनातील प्रश्न अन् उत्तरे.. पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय का घेतला? 

एनटीएने ‘एक्स’वरील निवेदनात म्हटले की, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्याने अर्ज करावा लागेल का? 

विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पूर्वीची नोंदणी आणि परीक्षा केंद्रांची निवड कायम ठेवली जाईल.

फी परत भरावी लागेल का? 

विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेली परीक्षा फी परत केली जाणार असून, नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तेवढाच काय तो विद्यार्थ्यांना दिलासा.

नव्याने होणारी परीक्षा कधी? 

एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, ही परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येईल याचे वेळापत्रक पुढील सात ते दहा दिवसांत जाहीर केले जाईल. वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक सत्रांत आणि प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ नये यासाठी ही परीक्षा शक्य तितक्या लवकर घेण्यात यावी असा आमचा प्रयत्न आहे. 

सराव परीक्षेच्या नावाने फोडली प्रश्नपत्रिका

नीट यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच महाराष्ट्रातील काही खासगी क्लासमध्ये मिळाले होते. एका खासगी क्लासने परीक्षेपूर्वी काही दिवस आधी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेतली होती. 

यामध्ये नीट यूजी परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न देण्यात आले होते. अशाच क्लासने घेतलेल्या सराव परीक्षेत ३०० प्रश्न विचारण्यात आले होते. यातील १२० प्रश्न हे नीट यूजी परीक्षेत आले होते, अशी माहिती एका समुपदेशकाने दिली.

Web Title : NEET UG 2026 रद्द; पेपर लीक के बाद लाखों छात्र फिर देंगे परीक्षा

Web Summary : पेपर लीक के कारण NEET UG 2026 रद्द कर दी गई है, जिससे 23 लाख छात्र प्रभावित हुए हैं। सीबीआई जांच के आदेश दिए गए हैं, और जल्द ही पुन: परीक्षा आयोजित की जाएगी। छात्रों को फिर से पंजीकरण करने की आवश्यकता नहीं है, फीस वापस कर दी जाएगी। एक निजी क्लास ने पेपर लीक किया।

Web Title : NEET UG 2026 Cancelled; Re-exam for Lakhs After Paper Leak

Web Summary : NEET UG 2026 is cancelled due to a paper leak, impacting 2.3 million students. A CBI inquiry is ordered, and a re-exam will be scheduled soon. Students need not re-register, fees will be refunded. A private class leaked the paper.