शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By संतोष कनमुसे | Updated: October 10, 2025 09:10 IST

Jayant Patil : आमदार जयंत पाटील यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

Jayant Patil :  मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. या टीकेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आमदार पाटील समर्थकांनी सांगलीत जाहीर सभा घेऊन गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, आता जयंत पाटील यांनी एका विशेष मुलाखतीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. 

ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर या शहरातील एका कार्यक्रमात आमदार जयंत पाटील यांची विशेष मुलाखत होती. यावेळी पाटील यांना आमदार पडळकर यांच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी पडळकर यांचे नाव न घेता फटकारले.

जयंत पाटील यांची टीका काय?

 ईश्वरपूरमधील एका विशेष मुलाखमतीमध्ये आमदार जयंत पाटील यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता फटकारले. "गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका याआधी कधी तुमच्या ४० वर्षाच्या राजकारणात केली नव्हती. तुमच्या आई -वडिलांबद्दल केलेल्या टीकेवर तुम्ही काहीच रिअॅक्ट झाला नाहीत. तुमची काय भावना आहे?', असा प्रश्न  मुलाखतीमध्ये आमदार पाटील यांना विचारण्यात आला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'क्या बड़ा तो सबसे दम बड़ा,मागे मी एकदा कुठेतरी सांगितले होते की, आपलं नाव ऐकलं नाही असं एकही गावही नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही", असं प्रत्युत्तर जयंत पाटील दिले.

"जाऊ दे वेळ येईल, आम्ही सगळे वाळवे तालुक्यातील लोक फार हुशार, दमदार आहेत. काळ वेळ बघू.आपला असेल तर त्याला समजावून सांगायचं, विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं. जो आपला नाही त्याला आपण सुधरवण्याचा प्रयत्न कशाला करायचा", असंही जयंत पाटील म्हणाले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Jayant Patil Retorts to Padalkar's Criticism: Power is Supreme

Web Summary : Jayant Patil responded to Gopicand Padalkar's criticism, stating that he doesn't react to comments about his parents. He emphasized his strength and influence, suggesting he knows how to handle both allies and opponents in his constituency, often choosing to ignore those not aligned with him.
टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरMaharashtraमहाराष्ट्र