वाड्यांची अवस्था अत्यंत बिकट; दुर्घटना घडल्यास जबाबदारी मालकाची, पुणे महापालिकेने बजावल्या नोटीसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:22 IST2026-05-06T17:22:21+5:302026-05-06T17:22:55+5:30

पुणे शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुने वाडे असून अनेक वाड्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, ते राहण्यास अयोग्यही ठरले आहेत

The condition of the mansions is very bad; If an accident occurs, the owner is responsible, Pune Municipal Corporation has issued notices | वाड्यांची अवस्था अत्यंत बिकट; दुर्घटना घडल्यास जबाबदारी मालकाची, पुणे महापालिकेने बजावल्या नोटीसा

वाड्यांची अवस्था अत्यंत बिकट; दुर्घटना घडल्यास जबाबदारी मालकाची, पुणे महापालिकेने बजावल्या नोटीसा

पुणे: पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील ३६ अतिधोकादायक मिळकतींना नोटिसा बजावल्या आहे. या मिळकती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुने वाडे आहेत. यातील अनेक वाड्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ते राहण्यास अयोग्य ठरले आहेत. महापालिकेच्या नियमानुसार दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अशा इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. यंदाच्या सर्वेक्षणात ३६ इमारती ‘अतिधोकादायक’ आढळल्या आहेत. महापालिकेने महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम २६८ (बी) व (सी) अंतर्गत या नोटिसा बजावल्या आहेत. रहिवाशांना नोटिसा मिळाल्या आहेत. 

 त्यांनी घर खाली न केल्यास आणि त्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित मालक किंवा भाडेकरूंची असेल. अशा परिस्थितीत महापालिका कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. धोकादायक वाड्यांची किंवा इमारतींची दुरुस्ती करायची असल्यास, ती ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२०’ मधील तरतुदीनुसारच करणे बंधनकारक आहे. ही कामे केवळ परवानाधारक वास्तुविशारद ) किंवा स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्या देखरेखीखालीच करावी लागणार आहेत.

ज्या इमारती वास्तव्यासाठी असुरक्षित आहेत, तिथे महापालिकेने ‘धोकादायक इमारत’ असे फलक लावले आहेत. तसेच सूचना पत्रकेही चिकटवण्यात आली आहेत. पावसाळ्यात एखादी इमारत किंवा भिंत कोसळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी ०२०-२५५०१००० या क्रमांकावर किंवा अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे महापालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title : जर्जर इमारतें: पुणे नगर निगम का नोटिस, दुर्घटना के लिए मालिक जिम्मेदार

Web Summary : पुणे नगर निगम ने 36 खतरनाक इमारतों के मालिकों को नोटिस जारी किया। निवासियों के खाली नहीं करने पर दुर्घटनाओं के लिए मालिक जिम्मेदार होंगे। मरम्मत नियमों के अनुसार और पेशेवरों की देखरेख में होनी चाहिए। पीएमसी ने चेतावनी संकेत लगाए और आपातकालीन संपर्क नंबर दिए।

Web Title : Dilapidated Buildings: Pune Municipality Issues Notices, Owners Liable for Accidents

Web Summary : Pune Municipal Corporation issued notices to owners of 36 dangerous buildings. Owners will be responsible for any accidents if residents don't vacate. Repairs must follow regulations and be supervised by professionals. PMC has posted warning signs and provided emergency contact numbers.