शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या तेराव्याला जाण्यास डीएसके कुटुंबियांना परवानगी; पोलीस बंदोबस्तात राहावे लागणार उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 18:31 IST

डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

ठळक मुद्देतब्बल अडीच वर्षांनंतर डीएसके कुटुंबीय काही तास तुरुंगांबाहेर येणार

पुणे : गुंतवणुदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यवसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या कुटुंबियांना मुलीच्या तेराव्यास उपस्थित राहण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. याबाबत सत्र न्यायाधीश जे.एन. राजे यांनी आदेश दिला आहे. त्यामुळे तब्बल अडीच वर्षांनंतर डीएसके कुटुंबीय काही तास तुरुंगांबाहेर येणार आहेत.डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला तुरुंगात असल्याने डीएसके यांना उपस्थित राहता आले नव्हते.त्यामुळे तेराव्याला उपस्थित राहण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज डीएसके, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी अ‍ॅड. आशिष पाटणकर आणि अ‍ॅड. प्रतिक राजोपाध्ये यांच्यामार्फत न्यायालयाला केला होता. या अर्जाची सुनावणी होऊन तिघांना १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तेराव्याच्या कार्यक्रमाला काही तास उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. कारागृहाबाहेर पडल्यापासून पुन्हा कारागृहात येईपर्यंत पोलिसांचे पथक त्यांच्यासोबत असणार आहे. त्यांनी कोरोना विषयक सर्व खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.डीएसके यांच्यावर दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अश्विनी देशपांडे याही आरोपी होत्या. डीएसके यांचे बंधु मकरंद कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर १७ फेब्रुवारी २०१८ रोजी पुणेपोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना दिल्ली येथील एका हॉटेलमधून अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी झाली आहे.त्यानंतर ते प्रथमच न्यायालयीन कामकाजाव्यतिरिक्त तुरुंगातून बाहेर येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयfraudधोकेबाजी