शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:56 IST

आम्ही कंपनीत नोकरी करीत होतो, आमच्यावर कुटुंबाची जबाबदारी असून आमच्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे या दोघांनी सांगितले.

नाशिक - टीसीएस कंपनीतील अत्याचार प्रकरणात शुक्रवारी प्रथमच दहशतवादी विरोधी पथकाची (ATS) एन्ट्री झाली. अटकेतील रजा रफिक मेनन (३५) तसेच शफी भिकन शेख (३६) यांची विभागीय एटीएस शाखेने तीन तास कसून चौकशी केली. एचआर मॅनेजर निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील एका आरोपीशी संबंध असल्याच्या संशयाने या दोघांची चौकशी करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. 

प्राप्त माहितीनुसार हे दोघेही एकेकाळी निदा खानचे विश्वासू सहकारी होते. देशाच्या सुरक्षेशी संबंधित काही प्रश्न दोघांना एटीएसने विचारल्याचे समजते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणांनी लक्ष घातले असून दिल्लीतील एटीएस टीमने एसआयटीकडून काही माहिती घेतली होती. त्यानंतर काही बाबींचा संशय गडद झाल्याने स्थानिक एटीएसला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. शफी तसेच रजा यांना तिसऱ्या गुन्ह्यात एसआयटीने अटक केली होती. शनिवारी या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येईल, परंतु, त्यापूर्वीच त्यांची चौकशी एटीएसने केल्याने चौकशीतून या दोघांचे तसेच निदा खानचे कनेक्शन तपासण्यात आले. शुक्रवारी पाच वाजता या दोघांचा ताबा एसआयटीकडून एटीएसने घेतला. एटीएसच्या कार्यालयात दोघांना आणण्यात आले. आम्ही कंपनीत नोकरी करीत होतो, आमच्यावर कुटुंबाची जबाबदारी असून आमच्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे या दोघांनी सांगितले. चौकशीनंतर पुन्हा त्यांचा ताबा एसआयटीने घेतला. चौकशीची माहिती सूत्रांनी दिली.

दोघांना विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

आंतरराष्ट्रीय टोळीशी काही संबंध आहे का?निदा खानची ओळख कधीपासून होती.आंतरराष्ट्रीय कॉल होत होते का?बाहेरुन काही फंडिंग वैगेरेघरी कोण कोण असते, कमवते व्यक्ती कितीकंपनीत धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता का?

चॅटिंगमधून धक्कादायक बाबी उघड दरम्यान, टीसीएस प्रकरणात डिजिटल व तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरणार असून अनेक पुराव्यांचे क्लोनिंग करण्यात आल्याने त्याच्यातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा करण्यात एसआयटीला यश आले आहे. आठही आरोपींचे मोबाइल, त्यांचे लॅपटॉप पथकाने जप्त केले होते. ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चेनानी हिला आरोर्पीचे आलेले एकूण ७८ मेल, २२ फोन कॉल फॉरेन्सिक टीमने तपासले. फरार निदा खान हिने आरोपींना केलेले चॅटिंगही तपासण्यात आले आहे. अटकेतील आरोपी व निदा खान यांच्यातील ऑफिस कामाव्यक्तिरिकत असलेले चॅटिंग संशयास्पद वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीडितांना फसवून धर्मांतराचा डाव रचण्यासाठी जो व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला होता त्याच्यातील बारकावेदेखील डिजिटल तपासणीतून करण्यात आली. एका रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजही एसआयटी पथकाने ताब्यात घेतले. ९ गुन्हे दाखल झाल्यानंतर पीडितांचा जबाब घेण्यात आला. प्रत्यक्ष पुरावा हाती हवा यासाठी डिजिटल व तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी पथकाने परिश्रम घेतले. 

English
हिंदी सारांश
Web Title : ATS enters Nashik TCS case; Nida Khan linked to bombing?

Web Summary : ATS investigates Nashik TCS abuse case, questioning Raza Menon, Shafi Sheikh. Suspicions arise about HR manager Nida Khan's connection to a Delhi bombing suspect. Digital evidence and WhatsApp chats reveal suspicious activity and conversion attempts.
टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसBlastस्फोट