शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:24 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

Donald Trump Warn Iran: मध्य पूर्वेतील देशांमधील युद्ध थांबण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. जर बुधवारी संपणाऱ्या मुदतीपर्यंत शांतता करार झाला नाही, तर युद्धविराम वाढवला जाणार नाही आणि अमेरिकन सैन्य पुन्हा एकदा इराणवर बॉम्बफेक सुरू करेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

एअर फोर्स वनवरून ट्रम्प यांची गर्जना

फिनिक्स येथून वॉशिंग्टनला परतत असताना एअर फोर्स वन या विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "कदाचित मी युद्धविराम वाढवणार नाही, पण इराणच्या बंदरांवरील आमची नाकेबंदी कायम राहील. दुर्दैवाने, जर करार झाला नाही, तर आम्हाला पुन्हा बॉम्बफेक सुरू करावी लागेल."

अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये झालेली चर्चेची फेरी निष्फळ ठरली आहे. ट्रम्प यांच्या मते, शांतता कराराअंतर्गत इराणमधील युरेनियमचा साठा अमेरिकेकडे हस्तांतरित केला जावा. मात्र, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा साठा कोठेही हलवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच जागतिक तेलाच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरून इराणला कोणतेही शुल्क आकारू दिले जाणार नाही, असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले आहे.

एप्रिलच्या मध्यापासून अमेरिकेने इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली आहे, ज्यामुळे इराणचा सागरी व्यापार ठप्प झाला आहे. इराणने याला बेकायदेशीर पाऊल म्हटले आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग 'आनंदी'

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जागतिक तेलाचा पुरवठा मार्ग पुन्हा सुरळीत होण्याच्या शक्यतेने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अत्यंत आनंदी आहेत. मे महिन्यात बीजिंगमध्ये होणारी दोन्ही नेत्यांची भेट ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण

जगातील २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा होमुर्झच्या सामुद्रधुनीतून होतो. जर ट्रम्प यांनी दिलेली बुधवारीची डेडलाईन टळली आणि पुन्हा युद्ध सुरू झाले, तर जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कडाडण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष बुधवारी होणाऱ्या घडामोडींकडे लागले आहे. त्यातून काही मार्ग निघणार की आखातात पुन्हा युद्धाचा भडका उडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Warns Iran: Peace or Bombing; Conflict Looms?

Web Summary : Trump warned Iran: agree to a peace deal by Wednesday or face renewed bombing. He threatened continued port blockades and expressed concerns over Iran's uranium stockpile, raising fears of escalating conflict and impacting global oil markets.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प