शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:55 IST

अयानच्या स्नॅपचॅटमधील न्यूड व्हिडिओचा 'गेम' नेमका कसा झाला याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Amravati Sexual Abuse Case:  परतवाडा शहरातील अयान अहमद याने काही मुलींशी केलेली शारिरिक जवळीक, दोघींवर केलेला लैंगिक अत्याचार, त्या क्षणांचे केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग व ते व्हिडीओ-फोटो व्हायरल केल्याच्या प्रकरणाने आता भयानक वळण घेतले आहे. मुख्य आरोपी अयान अहमद याच्या कृत्यासोबतच त्याचे मित्र आणि काही महाविद्यालयीन तरुणांच्या शेअर फॉरवर्डमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे. अयानच्या स्नॅपचॅटमधील न्यूड व्हिडिओचा 'गेम' नेमका कसा झाला, याचा थरारक उलगडा पोलीस तपासात झाला आहे.

अयान आणि उजेरखान हे जिवाभावाचे मित्र. मात्र, महिनाभरापूर्वी एका पानटपरीवर अयान आपला मोबाइल विसरला आणि उजेरने याच संधीचा फायदा घेतला. अयानच्या मोबाइलचा लॉक कोड माहीत असलेल्या उजेरने त्याचे स्नॅपचॅट उघडले आणि तिथे अनेक मुलींचे आक्षेपार्ह न्यूड व्हिडिओ पाहून त्याची मती गुंग झाली. त्याने तत्काळ स्वतःच्या मोबाइलमध्ये स्नॅपचॅट डाऊनलोड करून ते सर्व व्हिडिओ चोरले. हे व्हिडिओ मो. साद आणि एहफाज खान यांना पाठवले आणि तिथून या व्हिडिओ कांडाचे बिंग फुटले. अयान हा अनेक मुलींना घेऊन अमरावती व अन्य ठिकाणी जात असतो, व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो, हे उजेरला ज्ञात होते. किंबहुना फुशारकी मारण्यासाठी अयाननेही ती बाब उजेरला सांगितली होती.

शिक्षकाचाही सहभाग; फॉरवर्डची साखळी

या संपूर्ण साखळीत एका शिक्षकाचा हात असल्याचे समोर आले. परतवाड्यात शिकवणी वर्ग चालवणाऱ्या एहफाज खान याने आपल्या क्लासमधील मुलगी तर व्हिडिओत नाही ना, या नावाखाली ते व्हिडिओ पाहिले आणि पुढे इम्रान व नावेद यांना फॉरवर्ड केले. या साखळीत एकूण सहा जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. दुसऱ्या साखळीत उजेरने ते व्हिडीओ मो. साद व तबरेज खान यांना पाठविले.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून आढावा

शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपासाचा संपूर्ण आढावा घेतला. यापूर्वी राज्य अल्पसंख्याक आयोग व महिला व बालकल्याण विभागाने अमरावती व परतवाडा गाठून वास्तव जाणले होते.

भाड्याचा फ्लॅट की 'लैंगिक अत्याचाराचा अड्डा'

दुसरीकडे, कठोरा नाका परिसरातील मानव सुगंधे या तरुणाने आपला भाड्याचा फ्लॅट अयान अहमदला भाड्याने कसा दिला, याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. केवळ टू-बीएचके फ्लॅटचे भाडे परवडत नाही म्हणून 'तासिका तत्त्वावर' मुले-मुलींना फ्लॅट देण्याचा पार्टटाईम बिझनेस येथे सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अनेक मोबाइल जप्त केले असून, या विकृत साखळीत आणखी किती जण अडकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तथा डिलिट डेटा रिकव्हर केला जात आहे.

पीयूषने मानवला पाडले बळी, पैसेही मिळू लागले

कठोरा नाका रोडवरील त्या फ्लॅटवर मानवसोबत पीयूष नामक तरुण राहायचा. तोदेखील आपले रुम पार्टनर फ्लॅटमध्ये नसताना काही युगुलांना तेथे बोलवायचा, तासाप्रमाणे पैसे आकारायचा. मात्र अन्य जणांनी त्यावर आक्षेप घेतला. पुढे पीयूषने तो फ्लॅट सोडला. मात्र, पीयूषला फ्लॅटबाबत विचारणा व्हायची. त्यावेळी चार पैसे अधिक मिळतात, असे म्हणत त्याने मानवला त्यासाठी प्रवृत्त केले. पीयूषच्या अन्य एका मित्राच्या साहाय्याने अयान हा मानव सुगंधे याच्या संपर्कात आला. मानव हा तासाला ५०० रुपये घेऊन युगुलांना फ्लॅट ऐय्याशीसाठी द्यायचा.

टॅग्स :Amravati Sexual Abuse Caseअमरावती लैंगिक शोषण प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस