शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:41 IST

पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने एका महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघड

Pune Crime: पुणे शहर अंगावर काटा आणणाऱ्या एका हत्याकांडाने हादरले आहे. पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने, एका वकिलाच्या पत्नीने आपल्या १३ वर्षीय मुलीच्या मदतीने त्याच्या महिला सेक्रेटरीचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. चंदननगर परिसरातील जुन्या मुंढवा रोडवर असलेल्या वकिलाच्या कार्यालयातच हा रक्ताचा खेळ खेळला गेला. याप्रकरणी पोलिसांनी वकील, त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

पूनम दिनेश मून (वय ३२, रा. येरवडा) या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या कार्यालयात साहाय्यक (सेक्रेटरी) म्हणून काम पाहत होत्या. १६ एप्रिल रोजी त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. मात्र, ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती सावंत हिला पूनम आणि आपल्या पतीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच रागातून स्वाती आणि त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीने पूनम यांचे हात-पाय बांधले आणि बॅटने त्यांच्या डोक्यावर व तोंडावर सपासप वार करून त्यांची हत्या केली.

गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत पूनम घरी न परतल्याने त्यांचे पती दिनेश यांनी वकिलाला फोन केला. तेव्हा पूनम मैत्रिणीकडे गेली असेल, असे सांगून वकिलाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुक्रवारी सकाळी जेव्हा दिनेश स्वतः कार्यालयात पोहोचले, तेव्हा शटर उघडे असल्याचे दिसले. आत गेल्यावर समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रक्ताच्या थारोळ्यात पूनम यांचा मृतदेह पडला होता आणि तो एका पोत्यात भरून लपवण्याचा प्रयत्न केला गेला होता.या हत्याकांडात वकिलाची प्रत्यक्ष भूमिका नसली, तरी आपल्या डोळ्यासमोर घडलेला गुन्हा लपवणे आणि आरोपींना मदत करणे यामुळे ॲड. संजय सावंत यालाही सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वकिलाने ही संपूर्ण घटना माहित असूनही पोलिसांपासून लपवून ठेवली आणि पूनमच्या पतीला खोटी माहिती दिली.

पोलिसांची झडती आणि अटक

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अवघ्या ६ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.

राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ

ॲड. संजय सावंत हे भाजपच्या विधी शाखेचे प्रदेश स्तरावरील पदाधिकारी असल्याने या प्रकरणाची चर्चा संपूर्ण पुण्यात सुरु आहे. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Shaken: BJP Leader's Wife Murders Secretary, Hides Body

Web Summary : Pune reels as a BJP leader's wife, suspecting an affair, brutally murdered her husband's secretary with her daughter's help. The body was hidden in a sack. All three are arrested.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाPoliceपोलिस