शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 08:41 IST

पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाला अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली

Pune Airport:पुणे विमानतळावर शुक्रवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाला अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे लोहगाव विमानतळाची धावपट्टी तब्बल ९ तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे, पुण्याकडे येणारी आणि येथून उड्डाण करणारी ३० हून अधिक विमाने रद्द किंवा वळवण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

नेमकी घटना काय?

शुक्रवारी रात्री १०:२५ च्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानाचे पुण्याच्या धावपट्टीवर लँडिंग होत असताना अंडरकॅरेज फेल्युअर (लँडिंग गिअरमध्ये बिघाड) झाले. यामुळे विमानाचे हार्ड लँडिंग झाले आणि विमान धावपट्टीच्या मध्यभागी अडकून पडले. सुदैवाने, विमानातील वैमानिक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी किंवा नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

विमानसेवा कोलमडली, प्रवाशांचा खोळंबा

या घटनेनंतर रात्री ११ वाजेपासून विमानतळावरील सर्व हालचाली थांबवण्यात आल्या. पुण्याकडे येणारी किमान ८ विमाने सुरत, गोवा, नवी मुंबई, चेन्नई आणि कोईम्बतूर यांसारख्या शहरांकडे वळवण्यात आली. इंडिगो आणि आकासा एअरची पहाटेची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि वडोदरा जाणाऱ्या प्रवाशांचा समावेश होता.

मध्यरात्री विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. एअरलाईन्सकडून प्रवाशांना प्रवास रद्द करून रिफंड घेण्याचे किंवा थांबण्याचे पर्याय दिले जात होते.

युद्धपातळीवर दुरुस्ती 

नागरी विमानचालन राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेची दखल घेत तात्काळ हवाई दल आणि विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी सोशल मीडियाद्वारे विमानतळाबाबत माहिती दिली. धावपट्टीवर अडकलेले लढाऊ विमान हटवण्यासाठी क्रेन आणि अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. हवाई दलाच्या तांत्रिक पथकाने रात्रभर काम करून धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.

९ तासांनंतर 'टेक-ऑफ'

मुरलीधर मोहोळ यांनी आज सकाळी विमानसेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, "पुणे विमानतळाची धावपट्टी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाले आहे. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सकाळी ७:३० वाजल्यापासून विमानांचे उड्डाण आणि सकाळी ८:०० वाजल्यापासून लँडिंग सुरू करण्यात आले आहे."

तपासाचे आदेश

हवाई दलाने या घटनेच्या सखोल चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हे हार्ड लँडिंग झाले की अन्य काही कारण होते, याचा शोध आता घेतला जाणार आहे. दिवसभरात पुण्यातील विमान वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sukhoi's Hard Landing at Pune Airport; Major Accident Averted

Web Summary : A Sukhoi fighter jet's hard landing at Pune Airport caused a nine-hour runway closure, disrupting flights. Over 30 flights were cancelled or diverted. An investigation is underway to determine the cause.
टॅग्स :pune airportपुणे विमानतळindian air forceभारतीय हवाई दलmurlidhar moholमुरलीधर मोहोळ