तेहरान/वॉशिंग्टन: इस्रायल-लेबनॉन युद्धबंदीनंतर मध्य-पूर्वेतील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. इराणने जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'होर्मुझची सामुद्रधुनी' हा मार्ग पुन्हा एकदा खुला केला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी 'X' वरून ही माहिती दिली. मात्र, या निर्णयासोबतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे आणि इराणची त्याला मिळालेली प्रत्युत्तरं यामुळे परिस्थिती पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
इराणच्या 'पोर्ट्स आणि मॅरिटाइम ऑर्गनायझेशन'ने ठरवून दिलेल्या सुरक्षित मार्गावरूनच व्यापारी जहाजांना प्रवास करता येणार आहे. जागतिक व्यापार थांबू नये, यासाठी हे पाऊल उचलल्याचे अराघची यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे दावेयुरेनियमचा साठा ताब्यात घेणार: ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर दावा केला आहे की, इराण आपले संवर्धित युरेनियम अमेरिकाला सोपवण्यास तयार झाला आहे. "आम्ही इराणमध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर उत्खनन करू आणि युरेनियम अमेरिकेत आणू," असेही त्यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. इराण आणि अमेरिका शांतता कराराच्या खूप जवळ असून येत्या एक-दोन दिवसांत डील होऊ शकते, असेही ट्रम्प यांनी नमूद केले. इतकेच नाही तर, हा करार झाल्यास आपण पाकिस्तानच्या इस्लामाबादला भेट देऊ शकतो, असे संकेतही त्यांनी दिले.
नाकेबंदी उठवा, अन्यथा मार्ग बंदट्रम्प यांनी हॉर्मुझ उघडल्याबद्दल इराणचे आभार मानले असले, तरी इराणवर अमेरिकन नौदलाची नाकेबंदी कायम राहील, असे स्पष्ट केले आहे. यावर इराणने संताप व्यक्त केला असून, "जर आमच्या बंदरांवरील नाकेबंदी कायम राहिली, तर आम्ही हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करू," अशी चेतावणी दिली आहे.
Web Summary : Iran reopened the Hormuz Strait, but tensions flared after Trump's claims about uranium and continued naval blockade. Iran warned it would close the strait again if blockades persist, jeopardizing global trade.
Web Summary : ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य को फिर से खोला, लेकिन यूरेनियम और नौसेना की नाकाबंदी के बारे में ट्रम्प के दावों के बाद तनाव बढ़ गया. ईरान ने चेतावनी दी कि यदि नाकाबंदी जारी रही तो वह जलडमरूमध्य को फिर से बंद कर देगा, जिससे वैश्विक व्यापार खतरे में पड़ जाएगा।